Saam tv  Saam tv
महाराष्ट्र

Satara Crime News: साताऱ्यात खळबळ! न्यायालयीन परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार; नागरिकांत घबराटीचे वातावरण

Satara Crime News: साताऱ्यातील वाई न्यायालयीन परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची घटना घडली आहे.

ओमकार कदम, साम टीव्ही, सातारा

Satara News: साताऱ्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. साताऱ्यातील वाई न्यायालयीन परिसरात दिवसाढवळ्या गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. परंतु या घटनेने वाई परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. (Latest Marathi News)

मिळालेल्या माहितीनुसार, सातारा जिल्ह्यातील वाई न्यायालयीन परिसरात तीन कुख्यात गुंडावर गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. वाई शहरात मध्यवस्तीत घटना घडल्याने एकच खळबळ उडाली. या घटनेनंतर पोलिसांनी ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे.

नेमकं काय घडलं?

साताऱ्यातील वाई,भुईज परिसरातील कुख्यात गुंड अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव,निखिल आणि अभिजीत शिवाजी मोरे यांना आज न्यायालयीन कामकाजासाठी वाई न्यायालयात आणले होते. यावेळी यांच्या दिशेने गोळीबार करण्यात आला. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. परंतु या घटनेनंतर वाई परिसरात तणावाचे वातावरण झाले.

वाई मेनवली येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्या प्रकरणी अटकेत असलेल्या अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव आणि त्याच्या सहकाऱ्यावर वाई न्यायालयात हा गोळीबार झाला. या घटनेत दोन फायर होऊनही नशिबाने कोणाला दुखापत झाली नाही. मात्र घटनेने परिसरात खळबळ उडाली. घटनेची माहिती समजताच वाई पोलिसांनी तातडीने न्यायालयात धाव घेतली.

घटनास्थळी पोलिसांचा मोठा बंदोबस्त

दरम्यान, हॉटेल व्यावसायिकाला दहा लाख रुपयांच्या खंडणी मागणे आणि दरोडा टाकल्याप्रकरणी पोलिसांनी नुकतीच अटक केली होती. या आरोपींना न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानंतर आज न्यायालय परिसरात पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला. पोलिसांनी या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Malti Chahar : तान्या मित्तलला रडवणारी मालती चहर आहे तरी कोण?

Maharashtra Live News Update : राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्याला बेड्या, नेमकं प्रकरण काय?

Gold Rate Today : सोन्याची ऐतिहासिक घोडदौड, एक तोळ्याची किंमत ₹१२३००० च्या पार, आज कितीने दर वाढले?

Gautami Patil: ज्या गोष्टींमध्ये मी नाही, त्यात मला दोष देऊ नका; गौतमी पाटीलने केली विनंती|VIDEO

Hingoli ZP School : जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाची मनमानी; कारभाराविरोधात शिक्षणाधिकारी शाळेच्या समोर करणार उपोषण

SCROLL FOR NEXT