udayanraje bhosale 
महाराष्ट्र

BJP ला उदयनराजे नकाेसे झालेत? प्रदेशाध्यक्षांपुढील वक्तव्याने खळबळ

लाेकसभेच्या पाेटनिवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पराभव झाल्यानंतर भाजपाने उदयनराजेंना राज्यसभेत पाठविले

ओंकार कदम

सातारा (satara news) : माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर (ranjitsinh naik nimbalkar) हे पुढच्याचेळी साता-याचे खासदार व्हावेत अशी इच्छा दस्तुरखूद्द भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावस्कर (vikram pawskar) यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील (chandrakantdada patil) यांच्यासह फलटणकरांच्या समाेर नुकतीच व्यक्त केली. पावस्कर यांच्या विधानामुळं भाजपचे सध्याचे राज्यसभा खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) हे पुढच्या वेळीस सातारा (satara) लाेकसभा निवडणुकीला नकाेत का अशी चर्चा रंगू लागली आहे. udayanraje bhosale news

फलटण (phaltan) शहरात मंगळवारी (ता.७) फलटण तालुका भाजपा संपर्क कार्यालयाचा उदघाटनाचा कार्यक्रम हाेता. या कार्यक्रमास प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील हे प्रमुख पाहूणे हाेते. याच कार्यक्रमात भाजपाचे जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांनी एक खळबळजनक विधान केले. माढा मतदारसंघाचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर हे पुढच्याचेळी साता-याचे खासदार व्हावेत अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली.

विक्रम पावस्कर आपल्या भाषणात म्हणाले दादा, रणजितदादां सारखा खासदार सातारा लाेकसभेला हवा. त्यांचे काम हे जरी पाहिले तर भाजपा पक्ष म्हणून पुर्ण ताकदीने उतरणारा खासदार अशी त्यांची ख्याती आहे. पावस्कर यांच्या वक्तव्यावर रणजितसिंह म्हणाले मी आहे तेथेच बरा आहे यावर उपस्थितांमध्ये हशा पिकला.

दरम्यान राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून निवडून आलेल्या उदयनराजे भाेसले यांनी राजीनामा देत भाजपची वाट धरली हाेती. त्यावेळी लाेकसभेच्या पाेटनिवडणुकीत राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून पराभव झाल्यानंतर भाजपाने (bjp) उदयनराजेंना राज्यसभेत पाठविले. आता पावसकरांनी फलटण येथे केलेल्या विधानामुळे सातारा जिल्हा भाजपाला उदयनराजे आगामी लाेकसभा निवडणुकीसाठी नकोत की सर्वच भाजपामधील पदाधिका-यांना अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jerusalem Terror Attack : राजधानीत दहशतवाद्यांचा अंदाधुंद गोळीबार! ५ जणांचा जागीत मृत्यू, थरारक VIDEO समोर

Viral Video: अजबच! बी. एड . करणाऱ्या विद्यार्थ्यांचा जलवा, परीक्षेला चक्क हेलिकॉप्टरने गेले

Maval : ग्रामसभेत अंगावर रॉकेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न; ग्रामपंचायत प्रशासनाला कंटाळून नागरिक संतप्त

Bigg Boss 19: 'नॉमिनेशनचा दिवस येऊ द्या...', तान्या मित्तलने कुनिकाला दिली धमकी ; बिग बॉसच्या घरात नवा गोंधळ

Maharashtra Live News Update: बीडमध्ये पोलिसांना आडनाव न लावण्यावर प्रकाश महाजन यांनीही व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT