सातारच्या आंबेनळी घाट रस्त्यावर दरड कोसळली  Saam Tv
महाराष्ट्र

सातारच्या आंबेनळी घाट रस्त्यावर दरड कोसळली

महाबळेश्वरच्या आंबेनळी घाट रस्त्यावर काल सकाळी रस्त्याचे काम सुरू असल्याने, ठिकाणापासून काही अंतरावर परत दरड कोसळली आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सातारा : महाबळेश्वरच्या Mahabaleshwar आंबेनळी Ambenli घाट रस्त्यावर काल सकाळी रस्त्याचे काम सुरू असल्याने, ठिकाणापासून काही अंतरावर परत दरड कोसळली आहे. सुदैवाने यामध्ये जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. याठिकाणाची पाहणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजेश कुंभारदरे, गोपाळ लालबेग, ॲड. अरुण बावळेकर यांनी केली आहे. तालुक्यामध्ये जुलै महिन्यात अतिवृष्टीमुळे heavy rains आंबेनळी घाट रस्त्याचे नुकसान झाले होते.

हे देखील पहा-

आंबेनळी घाट रस्ता हा किल्ले प्रतापगड Pratapgad, तसेच कोकणाला Kokan जोडणारा हा मुख्य घाट रस्ता असल्यामुळे मागील दीड महिन्यापासून रस्त्यावर माती आणि मोठमोठे दगड हटविण्याचे काम सुरू आहे. एका ठिकाणी संपूर्ण रस्ता खचलेला होता. या खचलेल्या रस्त्यावर सध्या भर टाकून जाळीचे बेड तयार करून, त्या बेडमध्ये दगड भरण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. खचलेला रस्ता जोडण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. हे काम सुरू असताना या रस्ते कामाच्या अलीकडे काल सकाळी दरड कोसळली आहे.

यामुळे मोठे दगड माती मुख्य रस्त्यावर आल्यामुळे परत एकदा रस्ते कामात अडथळा निर्माण झाला आहे. सुदैवाने जीवित अथवा वित्त हानीयामध्ये झाली नाही. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने कोसळलेल्या दरडी हटविण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे. या ठिकाणची पाहणी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राजेश कुंभारदरे यांनी केली आहे. यावेळी गोपाळ लालबेग, ॲड. अरुण बावळेकर उपस्थित होते.

Edited By- Digambar Jadhav

.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : सत्तास्थापनेसाठी शरद पवारांसोबत चर्चा, बैठकीला अदानी नव्हते; देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

Assembly Election 2024: १५८ पक्ष विधानसभेच्या रिंगणात, भाजप तिसऱ्या क्रमांकावर, सर्वाधिक जागा कोण लढवतंय?

Sugarcane Juice: उसाच्या रसाचे आरोग्यदायी फायदे!

Maharashtra News Live Updates: नाशिक जिल्ह्यात उद्धव ठाकरे यांची तोफ धडाडणार

Maharashtra Politics : मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, देवेंद्र फडणवीस यांचं मोठं वक्तव्य

SCROLL FOR NEXT