Satara News Saam tv
महाराष्ट्र

Satara Accident : साताऱ्यात हिट अँड रन; पोलिसाने मद्यधुंद अवस्थेत कार चालवत एकाला चिरडले, अंगणात झोपले असताना काळाचा घाला

Satara News : भुईंज पोलिस स्टेशनला नाईट ड्युटी संपवून हवालदार ज्ञानेश्वर बाबुराव राजे हे कारमधून घरी निघाले होते. पहाटे सव्वा तीन वाजता सर्कलवाडीत आल्यावर त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने अपघात झाला

ओंकार कदम

सातारा : सातारा जिल्ह्यातील सर्कलवाडी या गावात हिट अँड रनचा थरार घडला आहे. एका मद्यधुंद पोलीसाने भरधाव वेगाने कार चालवत अंगणात झोपलेल्या एका व्यक्तीला चिरडल्याची घटना घडली आहे. या घटनेत सदर व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे प्रचंड खळबळ उडाली आहे. 

सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील सर्कलवाडी येथील रमेश लक्ष्मण संकपाळ (वय ५५) असे घटनेत मृत झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर भुईंज पोलिस स्टेशनला असलेली नाईट ड्युटी संपवून हवालदार ज्ञानेश्वर बाबुराव राजे (रा. वाघोली, ता. कोरेगाव) हे त्यांच्या कारमधून घरी निघाले होते. दरम्यान पहाटे सव्वा तीन वाजता सर्कलवाडीत आल्यावर त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने हा अपघात झाला. 

पोलीस कर्मचारी मद्यधुंद 

रात्रीच्या अंधारात भरधाव वेगाने गाडी चालवत ज्ञानेश्वर राजे मार्गस्थ झाले होते. मात्र ते ड्युटी आटोपून गाडी चालवत असताना त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्या बाजूला असल्याने घराच्या दिशेने भरधाव वेगाने गेली. दरम्यान पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर राजे हे दारूच्या नशेत गाडी चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर सदर पोलीस कर्मचाऱ्यास ताब्यात घेण्यात आले आहे.    

झोपेतच ओढवला मृत्यू 

गावात यात्रा असल्याने ग्रामदैवत जानुबाई देवीचा उत्सव सुरु आहे. तर सदर घटनेत मृत झालेले रमेश संकपाळ हे ग्रामदैवत जानुबाई देवीच्या छबिन्याचा कार्यक्रम आटोपून रात्री घराच्या बाहेर अंगणात झोपले होते. रात्री गाढ झोपेत असताना त्यांना भरधाव कारने चिरडले असता संकपाळ यांच्यावर काळाने घाला घातला. ऐन यात्रेत पहाटे झालेल्या या घटनेने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs SA ODI: क्विंटन डी कॉकच्या विकेटनंतर कोहलीचं भन्नाट सेलिब्रेशन; डान्सचा व्हिडिओ व्हायरल

केंद्रीय कृषीमंत्री-मुख्यमंत्र्यांमध्ये विसंवाद? राज्याने केंद्राला अतिवृष्टीचा प्रस्ताव पाठवला की नाही?

Maharashtra Live News Update: आमदार विजयसिंह पंडित यांनी घेतली अमृत डावखर यांची भेट

Thursday Horoscope : पैशांचं मोठं घबाड हाती लागणार; ५ राशींच्या लोकांची लॉटरी लागणार

लोकप्रतिनिधींनी लोकशाहीची चाड राखावी, बांगर आणि गायकवाडांना शिंदेंची तंबी

SCROLL FOR NEXT