Satara Accident News 
महाराष्ट्र

Accident : साताऱ्यात काळाचा घाला! आयशर ट्रक खोल दरीत कोसळला; लहान मुलासह ४ जणांचा मृत्यू

Satara Accident News : साताऱ्यातील कासरतळे येथे आयशर ट्रक ५० फूट खोल दरीत कोसळून भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत एका लहान मुलासह चार जणांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी आहेत.

Namdeo Kumbhar

ओंकार कदम, सातारा प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

four killed in Maharashtra truck accident : सातारा तालुक्यातील कासरतळे येथे आयशर ट्रकचा भीषण अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. रस्त्याच्या कडेला उभा असलेला एक आयशर ट्रक अचानक ५० फूट खोल दरीत कोसळल्याने ४ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये एका लहान मुलाचा आणि तीन महिलांचा समावेश आहे. या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण सातारा तालुक्यावर शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित कुटुंबाचे पुनर्वसन झाल्यामुळे ते आपल्या घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य आयशर ट्रकमध्ये भरत होते. सर्व साहित्य भरून हा ट्रक निघाला होता. पण त्याचवेळी रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या या ट्रकचा अंदाज चुकला आणि तो थेट ५० फूट खोल दरीत कोसळला. ट्रकचे साहित्य भरत असतानाच हा अपघात घडल्याने कोणालाही सावरण्याची संधी मिळाली नाही.

या ट्रकमध्ये केवळ घरातील साहित्यच नव्हते, तर कुटुंबातील पाळीव जनावरेदेखील होती. या भीषण अपघातात ट्रकमधील काही जनावरांचाही जागीच मृत्यू झाला आहे. सुदैवाने या अपघातात ट्रकचा चालक बचावला असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघात नेमका झाला कसा? याचा तपास पोलिसांकडून कऱण्यात येत आहे.

अपघाताचा आवाज होताच कासरतळे परिसरातील ग्रामस्थांनी तातडीने दरीच्या दिशेने धाव घेतली. जखमींना बाहेर काढून उपचारासाठी पाठवण्याचे शर्थीचे प्रयत्न करण्यात आले. या अपघातात दोघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सातारा जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने मृतदेह दरीतून बाहेर काढले असून ते पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा; सूवेंदू होणार बंगालचे अधिकारी, तामिळनाडूत विजय होणार मुख्यमंत्री

Saturday Horoscope : मनातील इच्छा पूर्ण होतील, खर्चाचं टेन्शन वाढेल; ५ राशींच्या लोकांची धनाने झोळी भरणार

KKR चा सलग चौथा विजय; दिल्ली कॅपिटल्सला घरच्या मैदानावर चारली धूळ

नवी मुंबई-कल्याणकरांचा प्रवास होणार जलद; ऐरोली-कटाई नाका कॉरिडोरचा दुसरा टप्पा पूर्ण, मार्ग कधी सुरू होणार?

कोकणच्या समुद्रातून पाणी होतंय गायब? हजार फुटांची ओहोटी, त्सुनामीची नांदी?

SCROLL FOR NEXT