solapur, telangana cm kcr saam tv
महाराष्ट्र

BRS चा भाजपला दणका? सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांसह ३५० कार्यकर्ते हैदराबादला मार्गस्थ

K. Chandrashekar Rao News : येत्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापुरातून आपली उमेदवारी निश्चितीसाठी सचिन सोनटक्के यांनी प्रयत्न सुरु केलेत.

विश्वभूषण लिमये

Solapur News : आषाढीनिमित्त सोलापूर जिल्ह्यात आलेले गुलाबी वादळ आता माजी मंत्री तथा भाजपचे विद्यमान आमदार सुभाष देशमुख (bjp mla subhash deshmukh) यांच्या दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात घोंगावत आहे. या तालुक्यातील बहुतांश गावचे सरपंच भारत राष्ट्र समितीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पाठाेपाठ ग्रामपंचायत सदस्य असे दाेन्ही मिळूण एकूण ३५० जणांचा बीआरएस पक्षात प्रवेश हाेेणार आहे. त्यासाठी सर्वजण ४० गाड्यांमधून शक्तीप्रदर्शन करत हैदराबादला मार्गस्थ झाले आहेत. (Maharashtra News)

पंढरपूरचे भगीरथ भालके यांच्यानंतर भाजपचे माजी खासदार लिंगराज वल्याळ यांचे पुत्र नागेश वल्याळ यांनी भारत राष्ट्र समितीमध्ये प्रवेश केला आहे. वल्याळ यांनी बीआरएस वाढीसाठी प्रयत्न चालवले आहेत. त्यातूनच सचिन सोनटक्के आणि नागेश वल्याळ यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यातील बहुतांश सरपंच हे बीआरएस प्रवेशासाठी हैदराबादला रवाना झाले आहेत.

दक्षिण सोलापूर तालुक्यावर आजपर्यंत धनगर समाजाचे प्राबल्य राहिले आहे. त्या दृष्टीकोनातून येत्या विधानसभा निवडणुकीत दक्षिण सोलापुरातून आपली उमेदवारी निश्चितीसाठी सचिन सोनटक्के हे तालुक्यातील बहुतांश सरपंचांना घेऊन ४० गाड्यांचा ताफा हैदराबादकडे रवाना झाला आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jio New Plan: jioची धमाकेदार ऑफर! आता 28 नाही तर 36 दिवसांचा रिचार्ज, सोबत दिवसाला 2GB डेटा अन् बरच काही

Hair Care : केसांना मोकळे सोडून झोपावे की बांधून? काय योग्य? जाणून घ्या...

'मार्व्हल'स्टाईल कॅम्पेनने भाजपची मुंबईच्या प्रचारात आघाडी, विरोधक राहिले मागे

Bigg Boss Marathi 6 : "तोंड शेणात घाल..."; बिग बॉसच्या पहिल्याच दिवशी तन्वी कोलते अन् रुचिता जामदार यांच्यात राडा; पाहा VIDEO

Maharashtra Live News Update : नाशिक पुणे महामार्ग ठप्प! रेल्वेसाठी रास्ता रोको

SCROLL FOR NEXT