santosh deshmukh Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: सरपंच हत्येत सर्वात मोठा ट्विस्ट, व्हिडीओ दाखवताच घुले पोपटासारखा बोलला, VIDEO

Beed Crime Update: सरपंच हत्येची सुदर्शन घुलेने कबुली दिल्याने आता आकाच्या अडचणी वाढल्या आहेत.. सुदर्शन घुलेने नेमकी काय कबुली दिलीय? घुलेच्या जबाबामुळे वाल्मिक कराडचं टेन्शन का वाढलंय? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून....

Bharat Mohalkar

सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट आलाय... आवादा कंपनीच्या खंडणीआड आल्यानेच संतोष देशमुखांची हत्या केल्याची कबुली सुदर्शन घुलेने दिलीय. पोलिसांनी आवादा कंपनीकडून खंडणी मागितल्याचा व्हिडीओ दाखवला आणि सुदर्शन घुले पोपटासारखा बोलायला लागला...एवढंच नाही तर सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदारने गुन्ह्याची कबुली दिलीय. त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय आणखीच खोलात गेलाय..

खंडणीत अडसर होत असल्यानं संतोष देशमुखांची हत्या - घुले

आम्हीच सरपंच संतोष देशमुखांचं अपहरण करुन हत्या केली - घुले

देशमुख आणि ग्रामस्थांनी केलेल्या मारहाणीचा मनात राग - घुले

आवादा कंपनीतला खंडणीचा व्हिडिओ दाखवताच घुलेची कबुली

देशमुखांच्या हत्येचा व्हिडिओ शूट केला - महेश केदार

आरोपींच्या कबुली जबाबानंतर धनंजय देशमुखांनी हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केलीय...तर सुदर्शन घुलेची ही कबुली वाल्मिक कराडला पळवाट मिळवून देण्यासाठी आहे का? असाही संशय व्यक्त केला जातोय.. तर दमानियांनी थेट धनंजय मुंडेंना सहआरोपी कऱण्याची मागणी केलीय..

सुदर्शन घुले, महेश केदार आणि जयराम चाटेच्या कबुलीत आवादा कंपनीच्या खंडणीचं कारण सांगितलंय..त्यामुळे वाल्मिक कराडचा पाय खोलात गेलाय. तर धनंजय मुंडेंचीही धाकधूक वाढलीय... आता या प्रकरणात पोलीस चौकशीचा फास आवळून धनंजय मुंडेंना सहआरोपी करणार का? याकडे लक्ष लागलंय...

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Rain: राज्यासाठी पुढचे ५ दिवस महत्वाचे, कोकणासह घाटमाथ्यावर तुफान पाऊस; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Maharashtra Live News Update: पोलादपूर -महाबळेश्वरला जोडणाऱ्या आंबेनळी घाटात दरड कोसळली

High Protein Risks: तुम्ही पण जास्त प्रोटीन घेता का? शरीरावर होतील हे गंभीर परिणाम

मेट्रोमध्ये महिलांचा राडा! प्रवाशांसमोरच धक्कादायक वर्तन; व्हिडिओ आला समोर

Mumbai Police: मुंबई पोलिसांना सलाम! महिलेचा समुद्रात उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसाने जिवाची पर्वा न करता वाचवलं प्राण

SCROLL FOR NEXT