Navi Mumbai : ऐका हो ऐका! नवी मुंबईतील 'या' भागांमध्ये उद्या पाणी पुरवठा राहणार बंद

Navi Mumbai Water Supply Update : भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास होणारा पाणीपुरवठा उद्या २८ मार्च रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत बंद करावा लागणार आहे.
Navi Mumbai Water Supply Updates News
Navi Mumbai Water Supply Updates NewsSaam Tv News
Published On

नवी मुंबई : नवी मुंबई राहणाऱ्या नागरिकांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ती म्हणजे, महानगरपालिका क्षेत्रातील पाणीपुरवठ्याबाबत अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये पाणीपुरवठा करणारी मोरबे धरणाची मुख्य जलवाहिनी सी.बी.डी. बेलापूर, सेक्टर २८ येथे आज लिकेज झालेला आहे. सदर ठिकाणी तातडीने पाईप लाईन दुरुस्तीचे काम उद्या शुक्रवार २८ मार्च रोजी सकाळी ११.०० वाजता हाती घेण्यात येणार आहे.

त्यासाठी भोकरपाडा जलशुद्धीकरण केंद्र येथून नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास होणारा पाणीपुरवठा उद्या २८ मार्च रोजी सकाळी ११.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत बंद करावा लागणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रास आणि सिडको क्षेत्रातील खारघर आणि कामोठे येथे होणारा उद्या संध्याकाळचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शनिवारी २९ मार्च रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होणार असल्याचं महापालिकाने सांगितलं आहे. दरम्यान, या कालावधीत नागरिकांनी पाणी जपून वापरावे आणि नवी मुंबई महानगरपालिकेस कृपया सहकार्य करावे, असं आवाहन करण्यात आलं आहे.

Navi Mumbai Water Supply Updates News
Jalgaon Crime : माझे पती फोन घेत नाही, जरा बघता का? पत्नीचा शेजाऱ्यांना फोन, घरात डोकावलं तर...

नवी मुंबई महानगरपालिकेमार्फत उद्या शुक्रवार २८ मार्च रोजी सकाळी ११ ते ६ वाजेपर्यंत एकूण ७ तास बंद राहणार आहे. त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील बेलापूर, नेरुळ, वाशी, तुर्भे, सानपाडा, कोपरखैरणे, घणसोली आणि ऐरोली या विभागात उद्या संध्याकाळी पाणी पुरवठा होणार नाहीय. तसेच या कालावधीत महानगरपालिका क्षेत्रातील जलवाहिनीवरील थेट नळजोडण्यांचा आणि सिडको क्षेत्रातील कामोठे आणि खारघर नोडमधील पाणी पुरवठा देखील बंद राहील, असं महानगरपालिकेनं सांगितलं आहे.

Navi Mumbai Water Supply Updates News
Central Railway : बदलापूर-कर्जतदरम्यान लोकल बंदच, मध्य रेल्वेचा रविवारी ३ तास स्पेशल ब्लॉक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com