Beed Saam
महाराष्ट्र

Beed News: मोकारपंतीच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपची कुंडली, डीपीमधली 'ती' तरूणी कोण? १४ सदस्य नावासकट समोर

Santosh Deshmukh Beed Case: देशमुखांना मारहाण करताना मोकारपंती ग्रुपमधून व्हिडिओ कॉल लावण्यात येत होते. या ग्रुपमध्ये नेमके किती सदस्य होते? याची माहिती समोर आली आहे.

Bhagyashree Kamble

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाला ३ महिने उलटले. सीआयडीनं दाखल केलेल्या दोषारोपत्रातून अनेक बाबी समोर येत आहेत. या दोषारोपत्रात मोकारपंती ग्रुपची कुंडली समोर आली आहे. या व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये किती सदस्य होते? व्हॉट्सअॅप ग्रुपच्या डीपीमधील ती तरूणी कोण आहे? संतोष देशमुखांना मारहाण करताना किती वेळा व्हॉट्सअॅप कॉल करण्यात आला होता? याची उत्तरं दोषारोपत्रात नमूद करण्यात आली आहे.

देशमुखांना मारहाण करताना मोकारपंती ग्रुपमधून व्हिडिओ कॉल लावण्यात येत होते. देशमुखांना अमानूष मारहाण करताना व्हॉट्सअॅप ग्रुपवर कॉल हा चालूच होता. आरोपपत्रात त्याचा स्क्रीनशॉटही जोडलेला आहे.

या ग्रुपच्या डिस्प्ले फोटोवर एका तरूणीचा फोटो असून, या ग्रुपमध्ये किती सदस्य आहेत, हत्येवेळी किती वेळा कॉल केले, याची माहिती आरोपपत्रात नमूद करण्यात आली आहे.

मोकारपंती व्हॉट्सअॅप ग्रुपमध्ये एकूण १४ सदस्य आहेत. या ग्रुपचा अॅडमिन फरार आरोपी कृष्णा आंधळे आहे. जेव्हा दिवंगत संतोष देशमुख यांना मारहाण करण्यात येत होती, त्यावेळी या ग्रुपमधून ४ व्हिडिओ कॉल करण्यात आले होते. ते सर्व कॉल कृष्णा आंधळेने केली असल्याची माहिती समोर आली आहे.

डीपीवर तरूणीचा फोटो

मोकारपंतीच्या ग्रुपच्या डीपीमध्ये एक तरूणी आहे. डीपीमध्ये टू पीस कपडे घालणारी तरूणी आहे. या ग्रुपमध्ये १४ सदस्य असल्याची माहिती आहे. महेश केदार, जयराम चाटे, सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, प्रतिक घुले यांच्यासह १४ जण ग्रुपमध्ये होती. ज्यावेळी कॉल केले, त्यावेळी वाल्मिक कराडही ते बघत होता, असा दावा आधीच सुरेश धस यांनी केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

Crime : चारित्र्याच्या संशयावरुन मारहाण, गर्भवती पत्नीचा मृत्यू; कुजलेल्या मृतदेहाजवळ तरुणाचे नको ते कृत्य

Nag Panchami: नागपंचमीला चुकूनही 'ही' कामे करु नका

SCROLL FOR NEXT