मकोका अंतर्गत जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडचे आणखी धक्कादायक कारनामे पुढे आले आहेत. कराड पोलिसांना शरण जाण्यापूर्वी कोणत्या बाबाकडे आपलं भविष्य पाहायला गेला? त्याला काय सांगण्यात आलं? यावरचा हा विशेष रिपोर्ट. बीड येथील मस्सजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याप्रकरण राज्यातील राजकारण चांगलंच तापलंय.
या हत्या प्रकरणानंतर रोज नवनवीन खुलासे होतायत. यात आता भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाईंनी वाल्मिक कराड याच्याबाबत धक्कादायक खुलासा केलाय. कराड सरेंडर होण्याआधी दिंडोरीतल्या अप्पासाहेब मोरेंच्या मठात आश्रित होता, असा आरोप देसाईंनी याआधीच केला होता. मात्र आता या मठात राहिल्यानंतर कराड भविष्य पाहाण्यासाठीही गेल्याचा दावा देसाईंनी केलायं. त्यामुळे खळबळ माजलीये. काय म्हणाल्यात तृप्ती देसाई पाहूया.
सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणांमध्ये वाल्मिक कराड हा मास्टरमाईंड असल्याचा आरोप सातत्यानं होतोय..भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई, सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया या प्रकरणांमध्ये सातत्याने धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडवर आरोप करताना पाहायला मिळतायत.
त्यामुळे कराडच्या अडचणी अजुन वाढण्याची शक्यता आहे. मात्र खंडण्या मागायच्या, इतरांचे आयुष्य उद्धवस्त करायचं आणि स्वतःचं भविष्य बघायला आश्रमात जाण्याचा कारनामा वाल्मिक कराडनं केलाय. मात्र यामुळे दिंडोरीतील आश्रमावरही सवाल उपस्थित झाले आहेत. समाजानं अध्यात्मिक प्रगती करावी म्हणून थाटलेल्या आश्रमातच जर मकोकाच्या गुन्हेगारांना आश्रय मिळणार असेल तर अशा आश्रमांनाही लवकरच टाळं लावण्याची गरज असल्याचा संतप्त भावना व्यक्त होतायत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.