Manoj Jarange Patil Warn Dhananjay Munde  Saam Tv
महाराष्ट्र

Santosh Deshmukh Case: देशमुखांना त्रास दिला, तर धनंजय मुंडेंना रस्त्यावरून फिरू देणार नाही; मनोज जरांगेंचा थेट इशारा

Manoj Jarange Patil Warn Dhananjay Munde: संतोष देशमुख यांना न्याय मिळावा यासाठी परभणीमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी थेट इशारा दिलाय.

Bharat Jadhav

बीडचे मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात राजकारण तापलंय. आज या हत्याप्रकरणातील इतर फरार आरोपींना अटक करण्यात आलीय. दुसरीकडे संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून परभणीत मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडे याचे नाव घेत त्यांना इशारा दिलाय.

मला कुणकूण लागल्या शिवाय कोणाच्या वाट्याला लागत नाही. आता मी नाव घेऊन बोलतो, जर यापुढे संतोष भैय्याच्या कुटुंबियांना आणि धनंजय देशमुख यांना त्रास दिला. त्यांच्या केसाला धक्का लागला तर तर धनंजय मुंडेला रस्त्यानं फिरू देणार नाही, असा इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी दिलाय. संतोष देशमुख यांना न्याय मिळावा म्हणून परभणी जिल्ह्यात मूक मोर्चा आयोजित करण्यात आला होता.या मोर्चात बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी थेट धनंजय मुंडेंवर तोफ डागली. पहिल्यांदाच थेट नाव घेत मुंडेंना जरांगे पाटील यांनी इशारा दिलाय.

संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना आणि धनंजय देशमुख यांना त्रास दिला तर धनंजय मुंडे यांना रस्त्याने फिरू देणार नाही. आमचा एक भाऊ गेला ते आम्ही सहन केलं. आम्ही मुंडे यांचे नाव कधी घेतलं नाही. पण यापुढे देशमुख कुटु्ंबियाना त्रास झाला तर एकाला रस्त्याने फिरू देणार नाही. येथून पुढच्या काळात जर मराठा समाजातील कुटु्ंबाला त्रास झाला तर परळी असो किंवा बीड जिल्हा असो. येथील आपल्या समाजाला त्रास झाला तर परभणी आणि तिकडून धाराशिवमधील लोकांना घरात घुसून मारायचं. जर इथून पुढे या लोकांना त्रास दिला तर परभणी आणि धाराशिवमधील लोकांनी यांना दम दाखवावा, असं जरांगे म्हणाले.

आरोपींना पुण्यात कोणी संभाळलं?

आज सकाळी संतोष देशमुख यांच्या हत्येतील फरार आरोपींना पुण्यात अटक करण्यात आली. यावरून जरांगेंनी सरकारला इशारा दिला. आम्हाला माज नाहीये, आम्हाला मस्ती नाहीये पण मुदडे पाडत असाल तर आम्हाला विचार करावा लागेल. तुम्ही आमचे माणसे मारून आरोपींना लपवून ठेवत असाल तर? सर्व आरोपी पुण्यातच कसं मिळतात,तेथूनच कसे सर्व आरोपी सापडतात. याचा अर्थ सरकारमधील मंत्री आरोपींना संरक्षण देत आहेत.

खंडणीतील आणि हत्येतील आरोपींची नार्को टेस्ट झाली पाहिजे अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केलीय. मुख्यमंत्री फडणवीस यांनी देशमुख कुटुंबियांना शब्द दिलाय.सरपंच यांच्या हत्येतील सर्व आरोपींनी अटक केली जाईल. त्यांना फाशी होईल.जर त्यांना शिक्षा झाली नाही तर आपण मुख्यमंत्र्यांनाही दाखवून देऊन मराठा समाज काय असतो. असं जरांगे म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Home Remedies : व्हाईट सॉक्स दिसतील एकदम नवीन! घाणेरडे मोजे स्वच्छ करण्याच्या सोप्या घरगुती टिप्स

Formal Pants For Woman: महिलांसाठी फॉर्मल पॅन्टचे 5 लेटेस्ट डिझाईन्स; ऑफिस लूकसाठी बेस्ट

Actress Death: भारतीय चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री काळाच्या पडद्याआड, वृद्धाश्रमात घेतला अखेरचा श्वास

Maharashtra News Live Update: दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आक्रमक; हेक्टरी 1 लाख, शेतमजुरांना 25 हजारांची मदतीची मागणी

Bike Mileage: बाईकला किती स्पीडमध्ये चालवली तर चांगलं मायलेज मिळतं? जाणून घ्या योग्य स्पीड

SCROLL FOR NEXT