
Beed Sarpanch Murder Case : केजमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या केल्याप्रकरणी आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या. अधिक तपासासाठी दोघांनाही सीआयडीच्या ताब्यात देण्यात येणार आहे. पोलीस अधीक्षकांनी यासंदर्भात माहिती दिली. दोघांच्या अटकेवर विरोधकांच्या आणि सत्ताधाऱ्यांच्या प्रतिक्रिया समोर आल्या आहेत. सुरेश धस यांनी पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि वाल्मीक कराड यांच्याकड अप्रत्यक्ष बोट केलेय. अटक करण्यात आलेले फक्त प्यादे आहेत. मुख्य आरोपी आका असल्याचे वक्तव्य सुरेश धस यांनी केली.
दोन आरोपींना पकडल्यानंतर सुरेश धस यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. पकडलेले आरोपी हे प्यादे आहेत, मुख्य आरोपी आका आहे. मी म्हणालो होतो, बकरे की अम्मा कब तक दुवा मागेगी. आज दोन आरोपींना अटक केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणांमध्ये चालू असलेल्या चौकशीमध्ये आपण समाधानी असल्याचे आमदार सुरेश धस म्हणाले आहे.
आरोपीला अटक करण्यासाठी 26 दिवस का लागले? याचा मास्टरमाईंड वाल्मीक कराड असल्याचे आम्ही पहिल्यापासून बोलतोय. वाल्मीक कराड याला अटक करून देखील 302 मध्ये का नाही? आरोपी गंभीर गुन्हा असताना देखील मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट होतो आणि सरेंडर कधी व्हायचे ते ठरवतो. यांना पुरावे नष्ट करायला वेळ दिला जातो. सीडीआरमध्ये ज्याचे नाव ते पोलीस प्रशासनाला मी देणार आहे. 28 तारखेला कराडने डिस्चार्ज घेतला. धनंजय मुंडे यांनी नैतिकता दाखवून हा तपास होईपर्यंत राजीनामा द्यावा. यातील आरोपी प्रशासनाने जनतेसमोर आणावे, असे संदीप क्षीरसागर म्हणाले.
आरोपी फारार होणे गुन्हा दाखल होण्यास विलंब होणे, हे पोलिसांच्या विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणार आहे. महाराष्ट्र पोलिसांचं जे नावलौकिक होतं, ते कमी होत चाललं हे दुर्दैवी आहे. आरोपीच्या गुन्ह्यांवर पांघरून घालण्यासाठी बीडच्या अधिकाऱ्यांनी काम केले. पोलीसांना आरोपीची माहिती असताना वेळ काढूपणा केला, असा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केलाय. धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी दुसऱ्या पक्षातील लोकं प्रयत्न करत आहे. असे अनेक प्रश्न या भोवताली फिरत आहे. प्रामाणिकपणे कोणत्याही दबावाला बळी न पडता याचा तपास व्हावा, असेही ते म्हणाले.
उशिरा का होईना अटक झाली, पुण्यातून अटक कशी होते? पोलिस यंत्रणा यांनी एक ऑफिशियल स्टेटमेंट काढा. दिल्लीतही या केसची चर्चा आहे अनेक जण विचारतात. महाराष्ट्र सरकारने ऑफिशियल खरं स्टेटमेंट काढावं. संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी बीड प्रकरणांमध्ये निर्णय घ्यावा. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पारदर्शकपणे परभणी आणि बीड प्रकरणात न्याय दिला पाहिजे,संवेदनशील पणा दाखवावा,राजकरण बाजूला ठेवून सगळ कारवाई झाली पाहिजे , असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.
हे प्रकरण पोलिसांच्या तपासामध्ये आहे आणि न्यायप्रविष्ठ आहे. ज्यावेळी आम्हाला वाटेल की पोलिसांचा तपास योग्य दिशेने चालत नाही, त्यावेळी हे प्रश्न आम्हाला विचारा. पोलिसांच्या कारवाईवर आपण विश्वास ठेवला पाहिजे. पोलिसांच्या कारवाईवर बाधा येईल असे काही करू नये. हे प्रकरण योग्य दिशेला न्यायचं असेल तर तपास सुरू राहिला पाहिजे.
सुरेश धस यांना फडणवीस यांचा आशीर्वाद असल्याशिवाय ते बोलणार नाहीत. यांना बीड मधील हे राजकारण मोडीत काढायचा आहे, असे संजय राऊत म्हणाले.
आरोपी कुठल्याही प्रकारचा असो. आरोपीला व्हीआयपी सेवा देणे संपूर्णपणे चुकीचे आहे. बीड प्रकरणात वाल्मीक कराडला जर व्हीआयपी सेवा मिळत असतील तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करावी. अशी थेट मागणी खासदार निलेश लंके यांनी केली. सरकारच्या सुरुवातीच्या काळात महाराष्ट्रात वेगवेगळ्या घटना घडत आहेत. यातून सरकारचे अपयश पुढे येत असल्याची टीका देखील यावेळी लंके यांनी केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.