Santosh Bangar 
महाराष्ट्र

Maharashtra Politics: 'तर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसेल...' आमदार संतोष बांगर यांचे शिवसेना नेत्याला आव्हान

या क्लिप बाहेर आल्या तर आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही असेही आमदार बांगर म्हणाले.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sanjay Bangar: शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतात. आपल्या वक्तव्यांमुळे कायम चर्चेत असणारे संजय बांगर यांनी काही दिवसांपूर्वीच शिवसेना नेते संजय राऊत पिसाळलेला कुत्रा आहे असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्यूत्तर दिले होते.

चंद्रकांत खैरै यांनी संतोष बांगर तडीपार गुंड असून त्याच्यावर अनेक खुनाचे आरोप आहेत असा आरोप केला होता. चंद्रकांत खैरे यांच्या या आरोपांनंतर संजय बांगर यांनी खैरेंवर जोरदार टीका केली आहे.

याबाबत संपूर्ण माहिती अशी की, शिवसेना (Shivsena) शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर आणि चंद्रकांत खैरे यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगले आहे. संतोष बांगर यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचा पिसाळलेला कुत्रा असा उल्लेख केला होता. ज्यावर चंद्रकांत खैरे यांनी जोरदार प्रत्यूतर दिले होते.

"संतोष बांगर हा तडीपार गुंड असून त्याच्यावर अनेक खुनाचे गुन्हे आहेत. त्याला पक्षाने अनेकवेळा मदत केली असून आदल्या दिवशी रडत होता, दुसऱ्या दिवशी उडी मारुन गेला हा संजय राऊतांवर (Sanjay Raut) बोलतो अशी टीका खैरेंनी केली होती तसेच त्याला सरळ करु," असेही ते म्हणाले होते.

चंद्रकांत खैरे यांच्या या वक्तव्याला प्रत्युत्तर देताना संतोष बांगर म्हणाले की, "चंद्रकांत खैरे वयाचं भान ठेवलं. आम्ही जर यांचं भांडं खोललं, तर मला वाटतंय चंद्रकांत खैरेंच्या क्लिप बाहेर आल्याशिवाय राहणार नाही,तसेच या क्लिप बाहेर आल्या" तर त्यांना आत्महत्येशिवाय पर्याय राहणार नाही असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: टोरंट पॉवरचे वृक्षतोड उबाठा शिवसेनेने पाडली बंद

Dalimb Benefits: रोज १ वाटी डाळिंब खा; हृदयापासून ब्लड प्रेशरपर्यंत शरीराला मिळतील ७ आरोग्यदायी फायदे

अंत्यसंस्कारावरून परतताना बस अन् ट्रकचा भीषण अपघात; 22 जणांचा मृत्यू, पाहा काळीज पिळवून टाकणारा VIDEO

किचनमध्ये कोणत्या दिशेला RO लावावं? दिशा चुकली तर होईल दुर्दशा

140KM वेगाचं भयानक 'अर्णब' चक्रीवादळ घडवणार विध्वंस; किनारपट्टीवरील राज्यांना अलर्ट जारी

SCROLL FOR NEXT