IPS Sanjay Verma Maharashtra New DGP : महाराष्ट्राचे वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय वर्मा यांची राज्याचे नवे पोलीस महासंचालक (Maharashtra New DGP) म्हणून निवड झाली आहे. सध्याते डीजीपी (कायदेशीर आणि तांत्रिक) म्हणून कार्यरत आहेत. रश्मी शुक्ला यांनी निवडणूक आयोगाने बदली केल्यानंतर संजय वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात विधानसभा निवडणुका असल्यामुळे संजय वर्मा तात्काळ पदभर स्वीकारतील, अशी माहिती समोर आली आहे. (IPS Sanjay Verma has been appointed as the new Maharashtra Director General of Police by the Election Commission of India)
विरोधाकांनी रश्मी शुक्ला यांच्यावर फोन टॅपिंगसह अनेक गंभीर आरोप केले होते. निवडणूक आयोगाने विरोधकांच्या आरोपाची दखल घेत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली. तीन आयपीएस अधिकाऱ्यांची नावे पाठवण्याचे आदेश निवडणूक आय़ोगाने दिले होते. त्यामधील संजय वर्मा यांची निवड केंद्रीय निवडणूक आयोगाने केली. संजय वर्मा १९९० च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. सध्या ते डीजी (law and Technical) म्हणून कार्यरत आहेत. एप्रील २०२८ मध्ये ते निवृत्त होऊ शकतात.
रश्मी शुक्ला यांची तातडीने बदली केल्यानंतर राज्याच्या नवीन महासंचालकांच्या नियुक्तीसाठी ३ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्याचे निर्देश देण्यात आले होते. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, पोलीस सेवेतले वरिष्ठ अधिकारी संजय वर्मा आणि रितेश कुमार या तीन जणांची नावे निवडणूक आयोगाकडे पाठवण्यात आली होती. आज निवडणूक आयोगाने संजय वर्मा यांची राज्याच्या पोलीस महासंचालक म्हणून नियुक्ती केली आहे. ते लवकरच पदभार स्वीकारतील.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.