Sanjay Shirsat on Rahul Gandhi Saam Tv News
महाराष्ट्र

Sanjay Shirsat: राहुल गांधी परभणीत राजकारणासाठी, सूर्यवंशी कुटुंबाशी त्यांना देणं-घेणं नाही; शिवसेनेचं प्रत्युत्तर

Sanjay Shirsat on Rahul Gandhi: राहुल गांधी हे परभणी येथे राजकारण करण्यासाठी गेले आहेत. त्यांना सूर्यवंशी कुटुंबीयांबद्दल सहानुभूती नाही, असं सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट म्हणाले.

Bhagyashree Kamble

परभणीच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील वातावरण चांगलंच तापलंय. शरद पवार यांनी परभणीत जाऊन सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांची भेट घेतली. हिंसाचारानंतर पोलिसांनी सोमनाथ सूर्यवंशी यांना अटक केली होती. मात्र, कोठडीतच त्यांचा मृत्यू झाला. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यूसाठी पोलीस जबाबदार असल्याचा आरोप विरोधकांनी केला.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी परभणीत जाऊन सूर्यवंशी कुटुंबीयांची भेट घेत सोमनाथ यांच्या मृत्यूसाठी मुख्यमंत्री जबाबदार असल्याचा आरोप केला. यावर राहुल गांधी हे परभणी येथे राजकारण करण्यासाठी आले आहेत. त्यांना सोमनाथ कुटुंबाबद्दल सहानुभूती नाही, असा घणाघात सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केला.

राहुल गांधी यांच्या परभणी दौऱ्यावर संजय शिरसाट म्हणाले, 'राहुल गांधी हे परभणी येथे राजकारण करण्यासाठी आले आहेत. त्यांना काय करायचे आहे कोणाविषयी? त्यांना केवळ घटनेचे पुस्तक घेऊन फिरायचं आहे. घटनेचे पुस्तक घेऊन त्यांना दाखवायचे आहे, की आम्ही घटना मानणारे आहोत.'

'राहुल गांधी ड्रामेबाजी करत आहेत. त्यांना जनतेच्या समस्येशी देणंघेणं नाही, त्यांना त्या कुटुंबीयांची सहानुभूती नाही , त्यांच्या पक्षाला मिळालेला एक विषय आहे आणि तेच घेऊन विरोधक चघळत बसतात. आम्ही सर्व लोकांचे नेते आहोत, हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यांच्या नौटंकीला लोक जुमानणार नाहीत, असं म्हणत संजय शिरसाट यांनी राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला.

'आम्हाला जातीय सलोखा राखायचा आहे. जातीत भांडणं लावायची नाहीत. राहुल गांधी पक्षाचे धोरण म्हणून जात आहेत. आम्ही बीड, परभणीला माणुसकी म्हणून जात आहोत. बीड, परभणीमध्ये गेल्यानंतर आम्ही वस्तुस्थितीची माहिती घेऊ, आणि त्यांना न्याय कसा देता येईल यासाठी प्रयत्न करू'. असं मंत्री संजय शिरसाट म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Monsoon 2026 Update: जूनमध्येही उष्णतेचा तडाखा कायम; महाराष्ट्रासह देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस

Maharashtra News Live Update: अकोल्यात जोरदार वाऱ्यासह पावसाची हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा

९० किमी वेग, धडकी भरवणारं वादळ धडकणार; हवामान विभागाचा मोठा इशारा, कुठे कोसळणार धो-धो पाऊस?

T20 वर्ल्ड कप खेळणारा संघ निलंबित; IPL होताच ICCची मोठी कारवाई

पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार; कुख्यात गुंडाची गोळ्या झाडून हत्या

SCROLL FOR NEXT