वैदेही काणेकर, मुंबई
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत हे राजकीय नेत्यासह चित्रपट निर्माते आहेत. संजय राऊत यांनी ठाकरे नावाचा सिनेमा तयार केलाय. संजय राऊत संजय राऊत कामगारनेते, पत्रकार आणि संसदपटू तसेच भारताच्या समाजवादी चळवळीतील महत्त्वाचे नेते जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर चित्रपट बनवत आहेत. पण त्या चित्रपटाची स्क्रिप्ट ईडीवाल्यांनी जप्त केलीय. याबाबतचा किस्सा संजय राऊत यांनी साम टीव्हीच्या ब्लॅक अॅण्ड व्हाईट या कार्यक्रमात दिलेल्या मुलाखतीत सांगितलाय.
शिवसेनेतील अनेक नेते ईडीच्या धाकाने भाजपमध्ये सामील झालेत किंवा त्यांच्यासोबत सत्तेत सामील आहेत. एकनाथ शिंदे यांच्यासोबतचे मंत्रीसुद्धा हे ईडीच्या धाकाने भाजपसोबत गेले आहेत. खासदार संजय राऊत यांचीही ईडीकडून चौकशी करण्यात आली होती. ते काही दिवस तुरुंगात सुद्धा होते. त्यावेळी ईडीनं त्यांच्या घरात छापेमारी केली होती.
त्या छापेमारीत काही काळबेरं असल्याच्या संशयातून ईडीने जॉर्ज फर्नांडिज यांच्या चित्रपटाची स्क्रिप्ट जप्त केलीय. याबाबत साम टीव्हीला सांगतांना संजय राऊत म्हणाले आम्ही त्या चित्रपटाचा खर्च त्यात लिहिला होता. त्यावरून ईडीला वेगळाच संशय आला त्यानंतर त्यांनी ती स्क्रिप्ट ताब्यात घेतलीय.
साम टीव्हीच्या कार्यक्रमात संजय राऊत यांनी तुरुंगातल्या आठवणी सांगितल्या. तुरुंगातील दिवसांवरून त्यांनी 'नरकातला स्वर्ग' नावाचं पुस्तक लिहिलंय. दरम्यान याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, खूप काही लिहिण्याचं राहून गेलं आहे. पण मी रोज लिहितो. खूप लिहितो. आजच्या अग्रलेखात काय लिहिलं आहे, ते लक्षात राहत नाही. पण खूप लिहितो, असे खासदार राऊतांनी सांगितलं.
"जॉर्ज फर्नांडिस यांच्यावर संजय राऊत यांनी स्क्रिप्ट लिहिली होती. त्या स्क्रिप्टच्या मागे बजेट लिहिलं होतं. पण 'ईडी'वाल्यांना काही कळत नाही. त्यांना ते आकडे दिसले. हिशोब असलेला कागदही वेगळ्या संशयाने त्यांनी ताब्यात घेतला. आता स्क्रिप्ट परत मिळवण्यासाठी संजय राऊत यांनी कोर्टात अर्ज दाखल केलाय. स्क्रिप्ट परत मिळाल्यावर पुन्हा काही करता येईल का ते पाहू? असं संजय राऊत म्हणालेत.
जॉर्ज मॅथ्यू फर्नांडिस कामगारनेते, पत्रकार आणि संसदपटू होते. ते जनता दल (संयुक्त) पक्षातील एक ज्येष्ठ होते. त्यांनी १९९४ साली नितीशकुमार यांच्यासोबत समता पक्षाची स्थापना केली होती. केंद्रीय मंत्री या नात्याने उद्योग, रेल्वे आणि संरक्षण या खात्यांसह अनेक खात्यांचा कार्यभार त्यांनी सांभाळला. जॉर्ज फर्नांडिस सर्वप्रथम १९६७ मध्ये दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. काँग्रेसचे पक्षाचे ज्येष्ठ नेते स. का. पाटील यांचा पराभव करत त्यांनी लोकसभेत प्रवेश केला होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.