Crime News: मुंबईच्या २४ वर्षीय महिलेवर दुबईत सामूहिक बलात्कार; ५ सहकाऱ्यांच्या वासनेची बळी पडली

Crime News: दुबईमध्ये एका २४ वर्षीय भारतीय महिलेवर तिच्या सहकाऱ्यांनी सामूहिक बलात्कार केल्याचा आरोप आहे. जुलै २०२३ मध्ये ती दुबईतील एका एजंट ५० वर्षीय माजिद यांच्यामार्फत दुबईला गेली होती.
Crime News
Mumbai CrimeSaam tv
Published On

मुंबईच्या एका २४ वर्षीय महिलेववर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना घडलीय. तिच्यासोबत मॅकडोनाल्डमध्ये काम करणाऱ्या ५ जणांनीच तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात येत आहे. ही घटना २७ ऑक्टोबर २०२४ रोजी घडली होती.

हाती आलेल्या माहितीनुसार, ही महिला दुबईतील एका माजिद नावाचा एजंटच्या मदतीने दुबईला गेली होती. एजंटने महिलेला आधी दोन महिलांसोबत राहायला सांगितलं होतं. तेथे ती घरकाम करत होती. नंतर त्याने तिला अबू धाबी येथील SEAF शाखेतील मॅकडोनाल्ड्स आउटलेटच्या स्वयंपाकघरात नोकरी दिली. पीडितेच्या आईचा आरोप आहे की, तिच्या पाच नेपाळी आणि इंडोनेशियन सहकाऱ्यांनी अबू धाबीमध्ये तिच्या खोलीत तिच्यावर बलात्कार केला. तिच्यावर क्रूरपणे शारीरिक अत्याचार केले.

Crime News
Mira Road : घरी बोलावलं अन् डाव साधला, पायलटकडून २३ वर्षीय एअर हॉस्टेसवर बलात्कार; मीरा रोड हादरलं

पीडितेला आधी प्रथम अबू धाबीमधील एका खासगी क्लीव्हलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि नंतर त्याच शहरातील सरकारी रुग्णालयात हलवण्यात आले. त्यानंतर १९ जून २०२५ रोजी, मॅकडोनाल्डमधील वरिष्ठ कर्मचाऱ्याने तिला मुंबईला पाठवले. ती सध्या कांदिवली पश्चिमेकडील शताब्दी रुग्णालयात दाखल आहे. तिला गंभीर मारहाण झाली होती त्यामुळे तिला मानसिक धक्का बसला होता.

ती कोणाशीही बोलू शकत नाही.पीडितेच्या आईने २६ जून २०२५ रोजी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. वर्सोवा पोलिसांनी तक्रार कांदिवली पोलिस ठाण्यात पाठवली, परंतु अद्याप एफआयआर नोंदवण्यात आलेला नाहीये.पीडितेची आई ही एक मध्यमवयीन महिला असून ती घटस्फोटित आहे.तिला तीन मुली आहेत आणि ते वर्सोवा येथे राहतात.पीडित मुलगी ही तिची मोठी मुलगी आहे. पीडितेचे वडील त्यांना सोडून गेल्यानंतर त्याची आर्थिक परिस्थिती हलाक्याची होती. त्यामुळे पीडितेच्या आईने तिला कामासाठी दुबईला पाठवले होते.

दरम्यान दैनंदिन खर्च भागवण्यासाठी पीडितेची आई नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांकडून मदत घेते. तिच्या इतर दोन मुली दहावी आणि बारावीत आहेत. मोठी मुलगी २४ वर्षांची आहे आणि तिने दहावीपर्यंत इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले आहे. त्यामुळे मुलीला चांगली नोकरी मिळावी, यासाठी आई धडपड करत होती. पीडितेच्या आईला एजंट माजिद माहित होता. तो दुबईला नोकरी मिळवून देतो असं माहिती होतं.

माजिद पीडितेच्या आईकडून मुलीला चांगल्या नोकरीचे आमिष देत पैसे उकाळत होता. जेव्हा पीडिता दुबईला पोहोचली तेव्हा एजंटने तिला त्याच्या इंडोनेशियन पत्नीसोबत राहायला लावले. तेथे वेगवेगळ्या देशांतील इतर अनेक मुलीही राहत होत्या. सुरुवातीला माजिदने पीडितेला नोकरी देण्याचे आश्वासन देत होता. पीडितेला सांगितले की तिचा सीव्ही चांगल्या कंपन्यांमध्ये पाठवण्यात आला आहे. तिला लवकरच नोकरी मिळेल.

तोपर्यंत त्याने पीडितेला पत्नीला मदत करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने तिला त्याच्या मित्राच्या पाकिस्तानी पत्नीच्या घरी पाठवली. पण ही महिला दुसरी तिसरी कोणी नव्हती तर ती माजिदची दुसरी पत्नी होती. त्यावेळी माजिद पीडितेला मानसिक त्रास देऊ लागला. पण पीडितेने त्यावेळी तिच्या आईला काही सांगितले नाही.

एकदा जेव्हा तिच्या आईने माजिदला तिच्या नोकरीबद्दल विचारले तेव्हा त्याने तिला सांगितले की तो तिच्या मुलीकडे स्वतःच्या मुलासारखे पाहतो आणि तिला धीर धरण्यास सांगितले. काही महिन्यांनंतर, त्याने पीडितेला अबू धाबी येथील SEAF शाखेतील मॅकडोनाल्डच्या स्वयंपाकघरात नोकरी मिळवून दिली. पण तिथे काम करणारी ती एकमेव भारतीय महिला होती. ती तिच्या कामाच्या ठिकाणाजवळील एका खोलीत इतर मुलींसोबत राहत होती. तर तिचे पुरुष सहकारी त्याच इमारतीच्या वरच्या मजल्यावर राहत होते.

तिच्या आईने आरोप केला की, इतर कर्मचारी तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करत होते. त्याचवेळी तिचा सहकारी ज्याचं नाव संदीप पाली होते. तो तिची काळजी घेऊ लागला.संदीप पीडितेच्या खोलीच्या वरच्या मजल्यावर पुरुष सहकाऱ्यांसोबतही राहत होता. संदीप पाली हा एक नेपाळी नागरिक होता, त्याने सहानुभूती दाखवल्याचे भासवले. तिच्याशी मैत्री केली आणि नंतर तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला.

२७ ऑक्टोबर २०२४ रोजी संदीपने पीडितेला काही कामाच्या बहाण्याने त्यांच्या खोलीत बोलावले. तेथे पाच जणांनी तिच्यावर बलात्कार केला. तिला मारहाणही केली. त्यानंतर त्यांनी तिला अबू धाबी येथील क्लीव्हलँड रुग्णालयात दाखल केलं. पीडितेला क्लीव्हलॅड रुग्णालयातील डॉक्टरांना तिच्या सहकाऱ्यांनी खोटी माहिती दिली. तिने झोपेच्या गोळ्या घेतल्या आणि तिने आत्महत्येचा प्रयत्न केला,असं सहकाऱ्यांनी डॉक्टराला माहिती दिली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com