Maharashtra Politics: यापुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठका घ्या! राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर शिरसाट संतापले

Dispute in Mahayuti : सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी विभागातील बैठका राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी घेतल्या होत्या. त्यावरून संजय शिरसाट नाराजी व्यक्त केलीय. त्यांनी आपली नाराजी पत्रातून व्यक्त केलीय.
Sanjay Shirsat
Sanjay Shirsat
Published On

महायुतीमधील धुसफूस काही कमी होताना दिसत नाहीये. कधी शिवसेनेचे मंत्री निधीवाटपावरून अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर नाराज असतात तर कधी नगरविकास खात्यातून आपल्या निधी मिळत नसल्याने भाजप आणि राष्ट्रवादीचे आमदार नाराज होतात. आता परत महायुतील अंतर्गत वाद सर्वांसमोर आलाय.

सामाजिक न्याय विभागाचे मंत्री संजय शिरसाट भाजप नेत्या आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यावर संतापले आहेत. त्यांच्या संतापाचे कारण ठरलं मिसाळ यांनी घेतलेली बैठक. मंत्री शिरसाट यांनी न कळवताच बैठक घेतल्याने संजय शिरसाट यांनी मिसाळ यांनी खरमरीत पत्र लिहिलंय.

Sanjay Shirsat
Vijay Ghadge Health : मोठी बातमी! अजित पवारांची पुण्यात भेट, लातूरला परतताना अचानक विजय घाडगे यांची प्रकृती खालावली

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी परस्पर बैठका घेतल्याचा आरोप शिरसाट यांनी केलाय. संजय शिरसाट यांनी लिहिल्या पत्रात नाराजी व्यक्त केलीय. संबंधित बैठक झाल्यानंतर याबाबत संजय शिसरसाट यांना माहिती मिळाली. त्यानंतर शिरसाट यांनी नाराजी व्यक्त केलीय. यापुढे बैठका घ्यायच्या असतील तर माझ्या अध्यक्षतेखाली घ्या, अशा स्पष्ट शब्दांत संजय शिरसाटांनी राज्यमंत्र्यांना बजावलं.

सामाजिक न्याय विभागातील कामकाज मंत्री आणि राज्यमंत्री यांच्यात कामाचे वाटप झाले. पण आमदारांच्या पत्रावरून मिसाळ यांनी काही बैठका लावत अधिकारी आणि कर्मचारी यांना विविध निर्देश दिलेत. मात्र याबाबत शिरसाट यांना कल्पना नव्हती. यावरून ते नाराजी झाले आहेत. दरम्यान पत्रातून संजय शिरसाट यांनी माधुरी मिसाळ यांना बजावलंय.

त्यामुळे त्यांच्या पत्राची जोरदार चर्चा आहे. याआधीही संजय शिरसाट यांनी आपल्या खात्याचे पैसे लाडकी बहीण योजनेसाठी परस्पर वळवल्याचा आरोप करत नाराजी व्यक्त केली होती. त्यावर अर्थमंत्री अजित पवार यांनी स्पष्टीकरण दिलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com