Sanjay Raut on Gungi Gudiya controversy Saam TV
महाराष्ट्र

Maharashtra Politics: महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे थडगे बांधले, अमित शाह-राष्ट्रवादी नेत्यांच्या भेटीवर राऊत भडकले

Sanjay Raut reaction to NCP leaders meeting Amit Shah : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्यानंतर संजय राऊत यांनी भाजप आणि दोन्ही राष्ट्रवादी गटांवर टीका केली.

Namdeo Kumbhar

मयूर राणे, मुंबई प्रतिनिधी

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची घेतलेली भेट आणि राज्यातील राजकीय परिस्थितीवरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी सत्ताधाऱ्यांवर अतिशय बोचऱ्या शब्दांत हल्ला केला आहे. अमित शाह यांनी महाराष्ट्राला दुबळे करण्यासाठीच हे दोन गट तयार केले आहेत. हे पक्ष नसून केवळ गट आहेत आणि ते लवकरच आपले अस्तित्व गमावून बसतील, असे राऊत म्हणाले.

संजय राऊत म्हणाले की, अजित पवारांनंतर हा पक्ष अनाथ झाला आहे. शरद पवारांनी उभा केलेला पक्ष आज गुजराती लोकांच्या पायाशी नेऊन ठेवला आहे. अमित शाह यांच्या पायाशी बसून या नेत्यांनी महाराष्ट्राच्या स्वाभिमानाचे थडगे बांधले आहे, यांना लाज वाटली पाहिजे. जबरदस्तीने नाव आणि चिन्ह मिळाले तरी हे लोक पक्ष चालवू शकत नाहीत. हे नेहमी गुडघ्यावरच राहणार आणि भविष्यात हे गट अमित शाह स्वतःच नष्ट करतील.

भाजपच्या आदेशावर चालणारे 'कठपुतळी' सरकार

पुढील काळात या गटांना भाजपमध्येच विलीन व्हावे लागेल, असा घणाघात राऊतांनी केला. ते म्हणाले की, "अजित पवारांचा मूळ पक्ष उरलेलाच नाही, सर्वकाही भाजपच्या आदेशावरून चालले आहे. अगदी गोकुळ दूध संघातही हसन मुश्रीफ आणि चंद्रकांत पाटील भाजपच्याच सूचनेनुसार काम करत आहेत. हा संपूर्ण खेळ महाराष्ट्राची ताकद कमी करण्यासाठी खेळला जात आहे."

"फडणवीसांसाठी रक्तदान शिबिर घेऊ..."

देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर राऊत यांनी जोरदार निशाणा साधला. ते म्हणाले की, "फडणवीस म्हणतात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत 'रेझिम चेंज' (सत्ताबदल) होऊ देणार नाही. जर त्यांना रक्ताची गरज असेल तर आम्ही त्यांच्यासाठी रक्तदान शिबिर आयोजित करू, पण देशात आणि राज्यात सत्ताबदल अटळ आहे."

चीन फंडिंग आणि ठाणे पोलिसांवर गंभीर आरोप

संजय राऊत यांनी भाजपवर चीनकडून निधी घेतल्याचा गंभीर आरोपही केला. "पीएम केअर्स फंडात चिनी कंपन्यांकडून १७१४ कोटी आणि भाजपच्या पार्टी फंडात ९११ कोटी आले आहेत. या निधीच्या बदल्यात तुम्ही लडाख आणि अरुणाचल प्रदेशची जमीन दिली का?" असा सवाल त्यांनी उपस्थित केला. याशिवाय ठाणे पोलीस प्रशासनावर ताशेरे ओढताना "ठाणे काय स्वतंत्र देश किंवा केंद्रशासित प्रदेश आहे का? अनेक अधिकारी वर्षानुवर्षे तिथेच ठाण मांडून आहेत. राजेंद्र शिंदे आणि मीनाक्षी शिंदे हे एकनाथ शिंदेंचे जावई लागतात का?" असा थेट हल्लाबोल केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

DA Hike : दिवाळीपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांची चांदी! 4 राज्यांचा मोठा निर्णय, DA थेट 63% वर

Transfer News : महाराष्ट्र पोलीस दलात मोठी प्रशासकीय उलथापालथ! १६ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

Maharashtra News Live Update : दिल्ली-पुणे इंडिगो विमानात धक्कादायक प्रकार; प्रवाशाचा आपत्कालीन दरवाजा उघडण्याचा प्रयत्न

रिकाम्या खोलीत बोलताना आवाज का घुमतो? यामागचं विज्ञान तुम्हाला थक्क करेल!

Face Care: चेहऱ्यावर येईल फ्रेश ग्लोईंग लूक, रोज दोन वेळा स्प्रे हे घरगुती सिरम, ७ दिवसात दिसेल फरक

SCROLL FOR NEXT