एव्हरेस्टजवळ अपघात! दोन हेलिकॉप्टरची हवेतच समोरासमोर धडक; एका भारतीयाचा मृत्यू, थरारक व्हिडीओ व्हायरल

Nepal Helicopter Crash : नेपाळमधील एव्हरेस्ट बेस कॅम्पजवळ दोन हेलिकॉप्टरची धडक होऊन अपघात झाला. या दुर्घटनेत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे, तर अन्य दोघे जखमी झाले आहेत.
Mount Everest helicopter crash Death
Mount Everest helicopter crash Deathसाम टीव्ही मराठी
Published On: 

Mount Everest helicopter crash Death : नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट परिसराजवळ एक अत्यंत भीषण अपघात घडला आहे. दोन हेलिकॉप्टर एकमेकांना धडकल्यामुळे झालेल्या दुर्घटनेत एका भारतीय नागरिकाचा मृत्यू झाला आहे, तर इतर दोघेजण जखमी झाले आहेत. प्राथमिक माहितीनुसार एव्हरेस्ट बेस कॅम्पजवळ एकाच ठिकाणी लँड करण्याचा प्रयत्न करत असताना ही दुर्दैवी टक्कर झाली. या घटनेमुळे नेपाळच्या पर्यटन आणि विमान वाहतूक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. (Nepal helicopter crash latest news)

नेपाळच्या सोलुखुंबू जिल्ह्यातील बर्फाळ प्रदेशात हा अपघात घडला. एव्हरेस्ट परिसरात उतरण्याचा प्रयत्न करत असताना दोन लहान हेलिकॉप्टर एकमेकांवर आदळून कोसळल्याची माहिती पोलिसांनी एएफपीला दिली. या अपघातात एका परदेशी नागरिकाचा जागीच मृत्यू झाला. आणखी एक व्यक्ती जखमी झाली आहे. (Everest Base Camp accident)

"एका परदेशी नागरिकाचा जागीच मृत्यू झाला आणि एका जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे," अशी माहिती सोलुखुंबू जिल्हा पोलीस प्रभारी नवीन राजा बुधाथोकी यांनी दिली. मृत्यू झालेला नागरिक भारतीय असल्याचे समजतेय. (Mount Everest helicopter crash video)

Mount Everest helicopter crash Death
सांगलीत रोहित पाटलांना जोरदार धक्का, पडळकरकरांनी गुलाल उधळला, संजयकाका पाटलांचा विजय; सुमनताई पाटलांचा १ मताने पराभव

व्हिडिओमध्ये दिसलेले भयानक दृश्य

अपघाताचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरही समोर आला आहे. त्यात लोक हेलिकॉप्टर उतरण्याची वाट पाहत असल्याचे दिसत आहे. अचानक दोन हेलिकॉप्टर आले आणि त्यांची टक्कर झाली. या धडकेमुळे दोन्ही हेलिकॉप्टरचे तुकडे झाले आणि ती जमिनीवर कोसळली. त्यामुळे जवळ उभ्या असलेल्या लोकांमध्ये घबराट पसरली.

Mount Everest helicopter crash Death
ST Employees Strike: लालपरीला ब्रेक! एसटी कर्मचाऱ्यांचा आजपासून संप; काय आहेत मागण्या? वाचा सविस्तर...

अपघात कसा घडला?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही छोटी हेलिकॉप्टर एकाच वेळी उतरण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात झाला. नेपाळमध्ये पर्यटक, गिर्यारोहक, रसद आणि आपत्कालीन परिस्थितीत लहान हेलिकॉप्टरचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. नेपाळची भौगोलिक परिस्थिती आणि प्रतिकूल हवामानात ही हेलिकॉप्टर उडवणे आव्हानात्मक असू शकते. बीबीसी नेपाळीच्या वृत्तानुसार, एव्हरेस्ट बेस कॅम्पजवळील फेरिचे गावात सकाळी ८.१५ च्या सुमारास हा अपघात झाला. फिशटेल एअर आणि एअर डायनेस्टी या कंपन्यांचे हेलिकॉप्टर एकाच ठिकाणी उतरण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी हा अपघात झाला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.