Sanjay Raut on Govt Saam TV News
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'देवेंद्र फडणवीसांनी १० अन् एकनाथ शिंदेंनी ५ साहित्यिकांची नावे सांगावीत'; संजय राऊतांचं ओपन चॅलेंज

Sanjay Raut Slams Govt: हिंदी सक्तीच्या विरोधात संजय राऊत आक्रमक; साहित्यिक, कलाकार आणि नेत्यांच्या गप्प राहण्यावर सवाल. मराठीसाठी लढा देण्याचा दावा करत सरकारवर जोरदार टीका केली.

Bhagyashree Kamble

महाराष्ट्रातील शाळांमध्ये पहिलीपासून हिंदी भाषेच्या सक्तीवरून जनतेत संतापाची लाट उसळली. जनतेसह अनेक नेत्यांनी या निर्णयाला विरोध दर्शवला. अखेर राज्य सरकारने माघार घेत तिसऱ्या भाषेची सक्ती रद्द केली. या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महायुती सरकारवर जोरदार हल्लाबोल करत महायुती सरकारमधील नेते, साहित्यिक आणि कलाकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत हल्लाबोल केला आहे.

हिंदी भाषा सक्तीविरोधात संजय राऊत महायुती सरकारवर कडाडले. त्यांनी साहित्यिकांवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केला. 'मराठी भाषेच्या मुद्द्यावर कुठल्याही साहित्यिकांशी चर्चा करण्याची आवश्यकता नाही. किती साहित्यिक पुढे आले आहेत छाती ठोकपणे बोलायला? देवेंद्र फडणवीस यांना दहा साहित्यिकांची नावे माहित आहेत का? एकनाथ शिंदे यांना तरी ५ साहित्यिकांची नावे माहित आहे का?', असा सवाल राऊतांनी केला.

यावेळी राऊतांनी साहित्यिकांवरही टीकेची तोफ डागली, 'जर खरोखरंच साहित्यिकांना मराठी भाषेची एवढी चिंता वाटत असेल, तर सध्या जी हिंदी भाषा लादण्याची मोहीम सुरू आहे, त्यावर त्यांनी आवाज उठवायला हवा होता. तिथे मात्र ते शांत का?' असा सवाल राऊतांनी उपस्थित केला.

तसेच यावेळी त्यांनी काही कलाकारांवर लक्ष्य करत प्रश्न उपस्थित केला. 'नाना पाटेकर कुठे आहेत? प्रशांत दामले कुठे आहेत? माधुरी दीक्षित कुठे आहेत? मराठी क्रिकेटपटू कुठे आहेत? मराठी माणसाने या सगळ्यांसाठी टाळ्या वाजवल्या. तुम्हाला खांद्यावर घेऊन नाचायचं, पण मराठी भाषेवर अन्याय होत असताना, तुम्ही गप्प का?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

'साहित्यिकांविषयी आम्हाला शिकवू नका. फडणवीस यांना हे लक्षात घ्यावं लागेल की ९० टक्के पुरस्कारप्राप्त आणि लाभार्थी लोक हे सरकारपुढे लाचार आहेत. त्यामुळे ते काही बोलणार नाहीत', असा घणाघातही यावेळी राऊतांनी केला.

"माझ्या मुली मराठी शाळेत शिकल्या आहेत"

राऊत म्हणाले, 'माझ्या मुलींनी मराठी शाळेत शिक्षण घेतलं आहे, त्यामुळे मला अभिमान आहे. मराठीसाठी बोलण्याचा मला हक्क आहे, आम्ही हट्टाने त्यांना मराठी शाळेत टाकले. तुमची मुलं कुठे आहेत? कोणत्या भाषेत शिकतात?', असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

"मराठीसाठी बैठकांचे ढोंग नको"

'भाजपमधील मंत्री, साहित्यिक, नेते यांच्या मुलांना इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकवले जात आहे. अशा परिस्थितीत तुम्ही मराठी भाषेसाठी कोणासोबत बैठक घेता? हे ढोंग थांबवायला हवं,' असा रोखठोक सवालही राऊतांनी केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sabudana Rabdi Recipe: श्रावण सोमवारच्या उपवासाला काही खास हवंय? घरच्या घरी बनवा साबुदाणा रबडी, वाचा रेसिपी

Akola Crime : आधी मंगळसूत्र चोरलं, नंतर परत देत चोरट्यांनी महिलेला माफी मागितली; नेमकं काय घडलं?

Maharashtra Live News Update: झालं ते चुकीचं झालं, मारहाणीचा कडक शब्दात निषेध - तटकरे

Today Gold Rate: सोन्याचे भाव पुन्हा १ लाखांच्या पार; वाचा २२ आणि २४ कॅरेटचे आजचे दर

वडिलांच्या संपत्तीसाठी मुलगा हैवान, जन्मदात्या आईला वृद्धश्रमात अन् बहिणीला मेंटल हॉस्पिटलमध्ये धाडलं | Pune

SCROLL FOR NEXT