Sanjay Raut strongly reacts to Eknath Shinde’s meeting with Amit Shah, raising questions over law and political ethics. saam tv
महाराष्ट्र

शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात; अमित शहा यांच्या भेटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल

Sanjay Raut On Eknath Shinde Amit Shah Meeting Controversy: संजय राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्या भेटीवर जोरदार टीका करत गंभीर आरोप केले. डी-लिमीटेशन विधेयकावर समर्थनाच्या अफवा फेटाळल्या असून सोनम वांगचुक यांच्या उपोषणाबाबतही चिंता व्यक्त केली.

Omkar Sonawane

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत भाजपवर जोरदार टीका केली. पेपर फुटी प्रकरणावर आंदोलन करणारे सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक गेल्या १७ दिवसांपासून उपोषणावर असून त्यांची प्रकृती खालावत असल्याची चिंता त्यांनी व्यक्त केली. हा अत्यंत गंभीर विषय असून सरकारने तातडीने दखल घ्यावी, असे राऊत म्हणाले. डी-लिमीटेशन (Delimitation) विधेयकावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) आणि शिवसेना (ठाकरे गट) समर्थन देणार असल्याच्या चर्चांना राऊत यांनी स्पष्ट शब्दांत फेटाळले. ही माहिती पूर्णपणे चुकीची असून जाणीवपूर्वक अफवा पसरवल्या जात आहेत, असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आज पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती देत, आमची त्यांच्याशी चर्चा झाली असून त्या सविस्तर भूमिका मांडतील, असे राऊत म्हणाले. मंगळवारी रात्री झालेल्या जयंत पाटील आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात झालेल्या बैठकीवर ते म्हणाले, जयंत पाटील हे महत्त्वाचे नेते असून त्यांच्या मतदारसंघातील नगराध्यक्षाला बेकायदेशीररित्या अपात्र ठरविण्यात आले, हा लोकशाहीसाठी धोकादायक प्रकार आहे.

एकनाथ शिंदे अन् अमित शाह यांच्या भेटीवर संजय राऊतांचा हल्लाबोल

एकनाथ शिंदे यांनी अमित शाह यांची फुटीर खासदारासमवेत भेट घेतल्याने राऊत यांनी जोरदार हल्लाबोल केला. या देशात कायदा आहे की नाही. एकनाथ शिंदे चोरीचा माल घेऊन दिल्लीच्या रस्त्यावर फिरतात आणि कायदा त्याला हटकत नाही. गृहमंत्र्यांकडे चोरीचा माल घेऊन जातात ही गंभीर गोष्ट असल्याचे राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chakan MIDC: चाकण MIDCमध्ये जीवघेणे खड्डे, वर्षभरात ३९९ जणांचा बळी, जबाबदार कोण?

Health Tips: चालताना पायाचे तळवे का दुखतात? काय आहेत कारणं?

Fake Police Fraud: खाकी वर्दीला भ्रष्टाचाराचा विळखा, पोलीस दलात वेतन घोटाळा; बोगस पोलिसांच्या नावे कोट्यवधींवर डल्ला

Maharashtra News Live Update: आंबोली महादेवगड येथील खोल दरीत पर्यटक कोसळला

Curry Leaves Benefits : केसगळती ते डायबेटिस...रोज कढीपत्ता खाल्ल्यानं होतील ६ जबरदस्त फायदे, वाचा

SCROLL FOR NEXT