Sanjay Raut SaamTv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: अमित शहा महाराष्ट्र फोडायला निघालेत, एकनाथ शिंदे लाचार; संजय राऊतांची बोचरी टीका

Sanjay Raut: अमित शहा महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि स्वाभिमानावर आक्रमण केलंय. ते महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत. दिल्लीतून अमित शहांकडून एकनाथ शिंदे यांना जमालगोटा दिला जातोय, अशी टीका संजय राऊतांनी केलीय.

Bhagyashree Kamble

Sanjay Raut Amit Shah criticism: केंद्रीय मंत्री अमित शहा यांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि स्वाभिमानावर आक्रमण केलंय. अमित शहा महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत. अमित शहा यांनी मराठी माणसाच्या स्वाभिमानावर पाय ठेवलाय. अशावेळी उद्धव ठाकरे बोलले असतील तर, शिंदेंनी कौतुक केलं पाहीजे. दिल्लीतून अमित शहांकडून एकनाथ शिंदे यांना जमालगोटा दिला जातोय, त्यामुळे शिंदे तोंडातून उलट्या करत असल्याची बोचरी टीका ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय

'राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळतोय. हे एकनाथ शिंदे यांनाही माहित आहे. तिसरा उपमुख्यमंत्री शिंदेंच्या पक्षातील असेल. ईडीचा जमालगोटा अमित शहांनी दिला म्हणून तुम्ही फुटला, आमच्याकडे ईडी आणि सीबीआय आला तर, आम्हीही जमालगोटा देऊ आणि ७२ तास संडसात बसवू', अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. 'ईडी आणि सीबीआयच्या जमालगोट्याच्या गोळ्या एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाला देण्यात आलंय. त्यामुळे अमित शहा यांच्या बाजूनं त्यांची पोपटपंची सुरू आहे' असंही राऊत म्हणाले.

'अमित शहाांनी महाराष्ट्राच्या अस्मितेवर आणि स्वाभिमानावर आक्रमण केलंय. ते महाराष्ट्र तोडायला निघाले आहेत. अमित शहा यांनी महाराष्ट्र माणसाच्या स्वाभिमानावर पाय ठेवलाय, अशावेळी उद्धव ठाकरे बोलले असतील तर, शिंदेंनी कौतुक केलं पाहीजे. एकनाथ शिंदे लाचार आहेत. शिंदेंना जो दिल्लीतील जमालगोटा दिला जात आहे, त्यामुळे शिंदे तोंडाने उलट्या करत' असल्याची टीका संजय राऊत यांनी केली.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारवर नियंत्रण नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारवर नियंत्रण नसल्याचं संजय राऊत म्हणाले. 'हे सरकार अत्यंत गोंधळलेलं मानसिकतेमध्ये आहेत. अर्थमंत्री एका बाजूला, मुख्यमंत्र्यांचं तोंड एका बाजूला, ठाण्याचे उपमुख्यमंत्री यांचं काय चाललंय, त्यांचे हेडक्वार्टर दरे गावात आहे. अशा तऱ्हेनं सरकारचं काम चाललेलं आहे. आपापल्या गटाचा मुख्यमंत्री वेगळा आहे. त्यामुळे निर्णय प्रक्रियेमध्ये अत्यंत गोंधळ आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सरकारवर नियंत्रण नाही. यामुळे महाराष्ट्रातील मराठी माणसांचं अत्यंत नुकसान होत' असल्याचंही राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra News Live Update: नांदेडमध्ये मोबाईल दुरुस्तीच्या कारणावरून वाद, दुकान चालकाला टोळक्याकडून बेदम मारहाण

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT