Dattatraya Bharne: अर्रर्रर्र! क्रीडामंत्र्यांचाच तोल गेला, व्हॉलिबॉल टोलवताना भरणे जमिनीवरच कोसळले; पाहा Video

Sports Minister Injured: दत्तात्रय भरणे आज पुणे जिल्ह्यातील एका क्रिडाप्रसंगी व्हॉलिबॉल खेळण्याचा आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळालं. मात्र, व्हॉलिबॉल खेळत असताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली जमिनीवर कोसळले.
Dattatray Bharne
Dattatray BharneSaam Tv News
Published On

दिलीप कांबळे, साम टीव्ही

सध्या पालकमंत्रिपदावरून महायुतीमध्ये रस्सीखेच सुरू आहे. तसेच काही आमदारांमध्ये वाद आणि नाराजीचा सुर पाहायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दावोस दौऱ्यावरून महाराष्ट्रात परतल्यानंतर पालकमंत्रिपदाचा वाद मिटणार असल्याचे समजते. दरम्यान राज्याचे क्रीडामंत्री इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी पदभार स्वीकारला असून, त्यांनी कामकाजाला देखील सुरूवात केली आहे. मात्र, त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे.

दत्तात्रय भरणे आज पुणे जिल्ह्यातील एका क्रीडाप्रसंगी व्हॉलिबॉल खेळण्याचा आनंद लुटत असल्याचे पाहायला मिळालं. मात्र, व्हॉलिबॉल खेळत असताना त्यांचा तोल गेला आणि ते खाली जमिनीवर कोसळले. त्यांचा व्हॉलिबॉल खेळत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ज्यात व्हॉलिबॉल खेळत असताना मंत्री भरणे दिसत असून, मात्र खेळताना तोल गेला आणि त्यांनी स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न केला.

Dattatray Bharne
Bollywood Death Threats: कपिल शर्मा, राजपाल यादव आणि रेमो डिसूझाला जीवे मारण्याची धमकी; पाकिस्तानशी कनेक्शन?

राज्याचे क्रीडामंत्री दत्तात्रय भरणे आज व्हॉलिबॉल खेळताना दिसले. मात्र, खेळताना त्यांचा तोल गेला आणि ते जमिनीवर कोसळले. यावेळी डोक्याला दुखापत होण्यापासून थोडक्याच बचावले. व्हॉलिबॉल खेळत असताना त्यांचा तोल गेला आणि पडत असताना त्यांचं डोकं लोखंडी पोलवर आपटण्याची शक्यता होती. मात्र, लोखंडी पोलवर धडकण्याच्या आधी त्यांनी स्वत:ला सावरलं. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली.

Dattatray Bharne
Pimpri Chinchwad: अपघाताचा बनाव रचत प्रियकराची हत्या, प्रेयसीच्या मुलीनंच केला प्रकरणाचा भंडाफोड

पुण्याच्या मावळमध्ये एका महाविद्यालयातील क्रीडा संकुलाचे उद्घाटन क्रीडामंत्री भरणेंच्या हस्ते झाले. त्यावेळी खेळाडू आणि क्रीडा शिक्षकांसमवेत विविध खेळांचा आनंद क्रीडामंत्र्यांनी घेतला. दरम्यान, व्हॉलिबॉल खेळण्यासाठी ते मैदानात उतरले. सुरूवातीला भरणेंनी व्हॉलिबॉल योग्यरित्या टोलवला. मात्र, विरोधी बाजूनं व्हॉलिबॉल टोलवताना नेटच्या पुढे आला आणि तो टोलवताना भरणे यांचा तोल गेला. ज्यामुळे ते जमिनीवर कोसळले. यात त्यांना मु्क्कामार लागल्याची माहिती आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com