Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

"शिवसेना किंग मेकर नव्हे किंग! राऊतांनी हाक द्यावी, शिवसैनिक रस्त्यावर उतरतील"

'पाच वर्षे नाही तर पुढील २५ वर्षे शिवसेना सत्तेत दिसेल आणि उद्धवजी मुख्यमंत्रीपदावर असतील.'

संजय डाफ, साम टीव्ही, नागपूर

नागपूर : युवा सेनेचा (Yuvasena) निश्चय दौरा संपूर्ण महाराष्ट्रात सुरु आहे, त्याचाच दुसरा भाग म्हणून विदर्भात मेळावे आहेत. युवा सेनेचं काम चांगलं सुरु आहे. युवा सेनेची ताकद वाढवण्याचे प्रयत्न सुरु शिवसेना (Shivsena) कुणाची टीम आहे असं मला वाटत नाही, शिवसेनेचे पक्ष प्रमुख मुख्यमंत्री आहेत. शिवसेना किंग मेकर नाही तर किंग च्या भुमिकेत आहे असं वक्तव्य युवा सेनेचे वरुण सरदेसाई (Varun Sardesai) यांनी नागपूरात केलं.

संजय राऊत (Sanjay Raut) शिवसेनेची बुलंद तोफ आहे. महाविकास आघाडीला एकत्र आणण्यासाठी राऊत साहेब यांची महत्त्वाची भुमिका आहे. संजय राऊत यांनी एक हाक द्यावी महाराष्ट्रातला प्रत्येक शिवसैनिक, युवासैनिक रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असही ते म्हणाले.

संजय राऊतांवर झालेली EDची कारवाई सुड बुद्धीतून झाली असून त्यांचा गुन्हा काय? हे भाजपचे नेते सुद्धा सांगू शकणार नाही. दीड महिने विधानसभा निवडणूकीनंतर संजय राऊत बोलले आणि त्यांच्या प्रयत्नांने भाजपचे (BJP) १०५ आमदार घरी बसवले आणि सेनेचा मुख्यमंत्री बनवून दाखवला. हा राग आहे. हाच गुन्हा आहे का?

हे देखील पहा -

गेले दोन अडीच वर्षे आपल्या कार्यकर्त्यांना धीर देण्यासाठी अशी वक्तव्य करतात. दर १५ दिवसांनी तारीख देतात. पाच वर्षे नाही तर पुढील २५ वर्षे शिवसेना सत्तेत दिसेल. आणि उद्धवजी मुख्यमंत्री दिसतील असही त्यांनी सांगितलं. अनेक नवीन लोक आमच्यासोबत येतात. जुने नवीन यांचा मेळ करण्याचा प्रयत्न सुरु असून जुनी नवी टीम मिळून शिवसेनेचं वादळ निर्माण करणार विदर्भात मंत्रीपदाबाबत पॅाझीटीव्ह निर्णय होणार. विदर्भावर अन्याय होणार नाही असं आश्वासनही त्यांनी यावेळी दिलं.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

Anant Chaturdashi 2025 live updates : गणपती विसर्जन मिरवणुकीत मंत्री गिरीश महाजन यांनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला

SCROLL FOR NEXT