Sanjay Raut Threat News SAAM TV
महाराष्ट्र

Sanjay Raut Death Threat: गेंड्याच्या कातडीचं सरकार, विरोधकांना मारण्यापर्यंत यांची मजल; संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Sanjay Raut Threat News: संजय राऊत यांना धमकीचा मेसेज आल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळे यांनी राऊत यांना झेट प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे

जयश्री मोरे

Supriya Sule On Sanajay Raut Threat News: ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना लॅारेन्स बिश्नोई गॅगकडून जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. या घटनेने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान धमकी देणारा व्यक्ती पुण्यातील असल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अधिक तपास करत आहेत.

या धमकीनंतर संजय राऊत यांनी राज्य सरकारव जोरदार हल्लाबोल केला आहे. हे गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे. हे विरोधकांना तुरुंगात टाकायला तयार आहे किंवा त्यांना मारण्यापर्यंत यांची मजल जाऊ शकते असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

सुप्रिय सुळेंची झेड प्लस सुरक्षेची मागणी

संजय राऊत यांना धमकीचा मेसेज आल्यानंतर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिय सुळे यांनी राऊत यांना झेट प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी केली आहे. तसेच यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांना देखील भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.

खासदार संजय राऊत यांना मोबाईलवर धमकीचा मॅसेज आला असल्याची माहिती मिळतेय. हिंदू विरोधी असल्यामुळे मारून टाकू अशी धमकी संजय राऊत यांना देण्यात आली आहे. "दिल्लीत आल्यावर AK 47 ने उडवून टाकू, मुसेवाला टाईपमध्ये मारु अशी धमकी राऊतांना देण्यात आली आहे. तसेच लॅारेन्स के और से मॅसेज है, सलमान और तू फिक्स... तयारी करके रखना" असे या मेसेजमध्ये म्हटले आहे.

दरम्यान संजय राऊत यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. धमक्या येत असतात पण विरोधकांना आलेल्या धमक्या सरकार गांभीर्याने घेत नाही, अशी प्रतिक्रिया राऊत यांनी दिली आहे. राऊत म्हणाले, महाराष्ट्रात होणाऱ्या दंगली, महिलांवर होणारे अत्याचार आपण पाहतोय. (Latest Marathi News)

परवा पोलीस खात्यातील वैभव कदम यांनी आत्महत्या केली असे अनेक प्रकार रोज घडत आहेत. पण राज्याचे मुख्यमंत्री, गृहमंत्री याला गांभीर्याने घेत नाहीत. आम्ही अशाप्रकारे आलेल्या धमक्यांची माहिती त्यांना देतो, तेव्हा थेट गृहमंत्री चेष्टा करतात. हे स्टंट आहे असे म्हणतात, असे संजय राऊत म्हणाले.

यावेळी राऊत यांनी याआधी आलेल्या धमकीची उल्लेखही केला. ते म्हणाले ठाण्यातील एका मोठ्या गुंड टोळीच्या म्होरक्याने मला धमकी दिली, तेही देखील गृहमंत्र्यांनी गांभीर्याने घेतले नाही. पोलिसांचा वापर विरोधकांचा आवाज दाबण्यासाठी, त्यांच्या विरोधात खोट्या कारवाया करण्यासाठी केला जात आहे, असे राऊत म्हणाले. तसेच काल रात्री पोलीस निरीक्षकांना मी कळवलं आहे. लोकप्रतिनिधी म्हणून एक नागरिक म्हणून कळवणं मला गरजेचं वाटलं, असे राऊत यांनी सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IND vs AUS : ऑस्ट्रेलियालाही गुंडाळलं; भारत आघाडीवर, AUS पिछाडीवर, पर्थचा कौल कुणाला?

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवारांना धक्का; कर्जत जामखेडमध्ये राम शिंदे आघाडीवर

Yeola Constituency : येवल्यातून छगन भुजबळ यांना केवळ 86 मतांची आघाडी | Marathi News

Assembly Election Result: सर्वात मोठी बातमी! कॉग्रेसचे ३ दिग्गज नेते पिछाडीवर, महायुतीचा डाव पडला भारी

Maharashtra Election Result: एकनाथ शिंदेंसोबत गेलेल्या आमदारांचं काय झालं? पाहा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT