Sanjay Raut  Saam Digital
महाराष्ट्र

Sanjay Raut : शिंदेंसोबत गुवाहाटीला गेलेल्या आमदारांना दिलं होतं गुंगीचं औषध; राऊतांचा खळबळजनक दावा

Sandeep Gawade

19 जून 2022 रोजी शिवसेनेचा 56 वा वर्धापन दिन साजरा झाला होता. त्याच्या तिसऱ्याच दिवशी म्हणजे 21 जानेवारी 2022 रोजी शिवसेनेच्या इतिहासातील सर्वांत मोठं बंड झालं. एकनाथ शिंदे शिवसेनेतून ४० आमदारांना फोडून भाजपसोबत गेले होते. त्यावर आज शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी, शिंदेन सोबत गेलेल्या आमदारांना त्यावेळी जेवणातून गुंगीचं औषधं दिली जातं असल्याचा खळबळजनक दावा केला आहे.

वोट जिहाद हा फेक नेरीटिव्ह असून, तो संघाकडूनच पसरवला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला आहे. धुळ्यामध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी संघ, भाजप, अजित पवार आणि मुख्यमंत्री शिंदेंवर जोरदार हल्ला चढवला. यावेळेस नितेश राणे यांचा विषय निघाल्यानंतर मात्र त्यांनी बोलण टाळलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महाराष्ट्रामध्ये विविध ठिकाणी भेटी देऊन दौरे करीत आहेत, सरकारी यंत्रणा वापरून पक्षाचा प्रचार मोदी करतात, त्याविरोधात निवडणूक आयोगाने गुन्हा दाखल करावा अशी मागणी संजय राऊत यांनी केली आहे, पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संपूर्ण देशाचे नव्हे तर भाजपच्या एका विशिष्ट गटाचेच पंतप्रधान असल्याचा आरोपही राऊत यांनी केला आहे.

वाशिम दौऱ्यादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्रमाच निमंत्रण नसल्याने आमदार नाराज असल्याबाबत संजय राऊत यांनी बोलताना आमच्या खासदारांना देखील या कार्यक्रमाचे निमंत्रण नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी शासनाचा कोट्यवधी पैसा खर्च करून भाजपचा प्रचारासाठी दौरे करतात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जर पक्षाचा प्रचार करण्यासाठी यायचं असेल तर त्यांनी पंतप्रधान पदाचे जोडे दिल्लीतच काढून यावेत असे देखील विधान संजय राऊत यांनी केले आहे, निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे, जर निवडणूक आयोग निष्पक्ष असेल तर त्यांनी याबाबत दखल घेतली पाहिजे असे देखील मत राऊत यांनी व्यक्त केले आहेत, नरेंद्र मोदी हे संपूर्ण भाजपाचे पण नाही तर भाजपातील एका विशिष्ट गटाचे पंतप्रधान आहेत असा देखील आरोप संजय राऊत यांनी करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे...

पुणे महाराष्ट्राचे क्राईम कॅपिटल झाले आहे हे देवेंद्र फडणवीस यांचा पाप आहे, देवेंद्र फडणवीस यांचा फेलीवर होम मिनिस्टर असा उल्लेख देखील यावेळी राऊत यांनी फडणवीस यांच्या बद्दल बोलताना केला आहे, त्यांचा लक्षात नाही त्यांचा कोणी ऐकतही नाही त्यांना कोणी जुमानत नाही असं म्हणत गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

PM Modi In Thane: मराठी, मेट्रो अन् मविआ; ठाण्यात PM मोदींची विरोधकांवर चौफेर टीका

Pune Devi Temple : मुंबईपासून हाकेच्या अंतरावर आहे जम्मूच्या वैष्णो देवी मंदिराची प्रतिकृती

VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

Marathi News Live Updates : काँग्रेसची ज्या राज्यात सत्ता येते ती राज्य उध्वस्त होतात, नरेंद्र मोदी

Fashion Tips : बॅगी जीन्ससोबत ट्राय करा 'हे' टॉप्स, फॅशन ट्रेंडमध्ये दिसाल स्टायलिश!

SCROLL FOR NEXT