VIDEO : उद्धव ठाकरेंचा मोदी-शिंदेंवर 'ठाकरी बाण'

Udhhav Thackrey : उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर टीकास्त्र डागलं आहे. आपल्या ठाकरी शैलीत त्यांनी शिंदे गट आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली.

उद्धव ठाकरेंनी केंद्र सरकारसह राज्य सरकारवर ताशेरे ओढले आहेत. मोदी त्यांच्या कंत्राटदार मित्रांचे खिसे भरायला महाराष्ट्रात येतात. अशी टीका उद्धव ठाकरे यांनी मोदींच्या महाराष्ट्र दौऱ्यावर केली आहे. तसेच गद्दारांना रोजगार मिळणार नाही असा थेट इशारा देखील त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.

आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यावर उद्धव ठाकरे यांनी जहरी टीका केली आहे. महाराष्ट्र दौरा हा कंत्राटदारांचे खिसे भरण्यासाठी आहे. केवळ कॉन्ट्रॅक्ट निघतात, प्रकल्पाच लोकार्पण होतं. मात्र प्रकल्प पूर्ण होत नाही. केवळ आपल्या कंत्राटदार मित्रांचे खिसे भरले जातात. त्या कंत्राटदारांच्या माध्यमातून यांच्या पदाधिकाऱ्यांचे खिसे भरले जात आहेत. असं ठाकरेंनी म्हंटलं आहे. यावेली त्यांनी शिंदे गटावर देखील टीका केलेली दिसली. दीड महिन्यानंतर सरकारमध्ये बसलेले हे सगळे गद्दार बेरोजगार होणार आहेत. त्यावेळी मी एकही गद्दाराला रोजगार देणार नाही. असा थेट इशारा त्यांनी शिंदे गटाला दिला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com