Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut: अशोक चव्हाण २ वर्षांपूर्वीच पक्ष सोडणार होते; संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Sanjay Raut on Ashok Chavan: अशोक चव्हाण हे गेल्या बऱ्याच काळापासून पक्ष सोडण्यासाठी धडपड करत होते. त्यांना आज त्यासाठी मुहूर्त मिळाला, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Ruchika Jadhav

Sanjay Raut News:

अशोक चव्हाण 2 वर्षांपूर्वीच काँग्रेस पक्ष सोडणार होते. एकनाथ शिंदे गेले त्यावेळीच चव्हाणांचीही काँग्रेस पक्ष सोडण्याची योजना होती. अशोक चव्हाण हे गेल्या बऱ्याच काळापासून पक्ष सोडण्यासाठी धडपड करत होते. त्यांना आज त्यासाठी मुहूर्त मिळाला, असा गौप्यस्फोट खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

आमचं टार्गेट आहे BJP संपवणं

BJP ने आमची कितीही लोकं फोडण्याचा प्रयत्न केला तरी मी तुम्हाला सांगतो की, यांच्यापेक्षा जास्तीच्या 10 जागा माविआ जिंकेल. जागावाटपाच्या फॉर्म्यूलावर जवळपास सर्व चर्चा झाली आहे. आमचं टार्गेट BJP संपवणं आहे, अशा शब्दांत संजय राऊतांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे.

अशोक चव्हाणांसोबत विजय वडेट्टीवार हे सुद्धा येणार?

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसची साथ सोडत भाजपचा 'हात' धरला आहे. अशात आमदार रवी राणा यांनी मोठा दावा केलाय. अशोक चव्हाण यांच्यासोबत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार देखील येणार आहेत, असा दावा रवी राणा यांनी केलाय.

विजय वडेट्टीवार विरोधी पक्षनेता असले तरी त्यांचं काय सुरू आहे ते मला माहीत आहे. अमरावती जिल्ह्यातील काँग्रेस आमदार देखील भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा देखील रवी राणा यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video : नागमणी घेतल्याशिवाय जाणार नाही वाटतं...; महामार्गावर मध्यरात्री तरुणींचा नागीण डान्स, नेटकऱ्यांच्या मजेशीर कमेंट्स; VIDEO व्हायरल

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींची चिंता वाढली, ३० लाख महिलांना ₹१५०० मिळणार नाहीत; तुमचंही नाव आहे का?

Valentine Day Love Letter: 'प्रेम हे फक्त प्रेम असतं, पहिलं-दुसरं असं काही नसतं'

Today Panchang: आजचे पंचांग आणि राशीसंकेत: शुक्रवार कोणासाठी ठरणार फायदेशीर?

Brinjal Dishes : वांग्याच्या ५ सोप्या अन् चविष्ट रेसिपी, आताच नोट करा साहित्य-कृती

SCROLL FOR NEXT