सचिन जाधव
दिवसेंदिवस फसवणुकीच्या लुटमारीच्या घटना वाढल्या आहे. पुण्यातून (Pune) गुन्हेगारीच्या रोज नव्या घटना समोर येत आहेत. अशीच एक फसवणूकीची घटना पुन्हा समोर आली आहे. चक्क पोलीस असल्याच्या बनाव करून एका दाम्पत्याला लाखोंना लुबाडल्याची घटना पुण्यात घडली आहे. आपण या घटनेविषयी सविस्तर जाणून घेऊ या. (Latest Crime News)
पोलीस असल्याचं सांगून चोरट्यांनी एका दाम्पत्याला लुबाडल्याची घटना पुण्यामधील कोंढव्यातील आशीर्वाद चौकात (Couple Robbed On Pretext of Police) घडली. याप्रकरणी कोंढवा पोलीस पुढील तपास करीत आहे.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलीस असल्याचं सांगून जोडप्याला लुटलं
दाम्पत्याकडील परदेशी चलनासह चार लाख ७९ हजार रुपये घेऊन चोरटे मोटारीतून पसार झाले आहेत. याबाबत सालेह ओथमान अहमद (वय ५२, रा. मीठानगर, कोंढवा) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली (Pune Crime) आहे.
तक्रारदार मूळचे आखाती देशातील आहे. गुरुवारी सायंकाळी ते पत्नीसमवेत कोंढवा भागातून पायी जात होते. त्यावेळी मोटारीतून आलेल्या चोरट्यांनी पोलीस असल्याची बतावणी (Couple Robbed In Pune) केली. त्यांनी अरबी भाषेत संवाद साधत तक्रारदार जोडप्याकडे वस्तू आणि कागदपत्रांची मागणी केली होती.
रोकड घेऊन चोरटे पसार
कागदपत्रांची पडताळणी करण्याच्या बहाण्याने सौदी रियाल, अमेरिकन डॉलर आणि भारतीय चलनातील चार लाख ७३ हजार रुपये घेऊन चोरटे पसार झाले. याबाबत सालेह अहमद यांनी रविवारी रात्री पोलीस ठाण्यात तक्रार (Crime News) दिली. त्यावरून गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पूजा पाटील करीत आहेत.
दिवसेंदिवस या घटनांचं प्रमाण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या जोडप्याला पोलीस असल्याचं सांगून लाखोंना गंडा घातला (Pune News) आहे. पुण्यात वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होताना दिसत आहे.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.