Sanjay Raut News  saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut : बाळासाहेबांचा आशीर्वाद घ्यायचा असेल तर...; संजय राऊतांचा हल्लाबोल

बाळासाहेब सर्वांचे होते, ते आजही सर्व पाहत असतील हे लक्षात ठेवा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुंबई - शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृती दिन आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)आज सायंकाळी ४ वाजता शिवाजी पार्क येथे जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन करणार आहेत. यावरून आता संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

बाळासाहेबांच्या स्मारकावर जाताना हातातले खंजीर बाजून ठेवा आणी मग नतमस्तक व्हा. ज्यांना बाळासाहेबांनाअभिवादन करायचं त्यांना करू द्या. बाळासाहेब सर्वांचे होते, ते आजही सर्व पाहत असतील हे लक्षात ठेवा अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. बाळासाहेबांच्या पाठीत जे खंजीर खुपसतात त्यांचं कधी भलं झालं नाही. हा इतिहास आहे. सर्वजण स्मृतीस्थळावर जाऊ शकतात पण चांगल्या मानाने जा, असा टोला देखील राऊतांनी यावेळी लगावला आहे.

यावेळी त्यांनी दिल्लीतील श्रद्धा हत्याकांडावर देखील संतंप्त प्रतिक्रिया दिली आहे. ते कपल नव्हतं, आपल्या महाराष्ट्रातील मुलीची निर्घृण हत्या झाली आहे.ही क्कादायक आणि दुर्देवी घटना आहे. अशा घटनांतून समाज कुठे चाललाय याची कल्पना येते. अशा गुन्हेगारांवर खटले न चालवता परिस्थितीजन्य पुराव्यावरून खुन्यांना फासावर लटकवले पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. तसेच या मुद्यावर राजकारण करणं चुकीचं असल्याचे देखील राऊत यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind Vs Eng सामना उशिराने सुरु, पावसामुळे भारताची विजयाची संधी हुकणार?

Bogus Soyabean Seeds : पेरलेले सोयाबीन उगवलेच नाही; शेतकऱ्यांकडून सोयाबीनची दुबार पेरणी

Unmarried Bollywood Actress: 'या' प्रसिद्ध अभिनेत्रींनी अजून केलं नाही लग्न

Mahayuti: नवी मुंबईत राजकीय घडामोडींना वेग; अजित पवार गट महायुतीतून बाहेर पडणार?

Mumbai Shocking : लव्ह, समलैंगिक संबंध अन् १६ वर्षीय मुलाचा संशयास्पद मृत्यू; मुंबईत अनोख्या प्रेमाचा धक्कादायक अंत

SCROLL FOR NEXT