Mahayuti: महायुतीचं ठरलं! मुंबईत एकत्र,राज्यात स्वतंत्र, विजयाची रणनिती काय?

Corporation Election: स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी महायुतीची रणनिती ठरलीय? मात्र अनेक पालिकांमध्ये महायुतीत धुसफुस पाहायला मिळतेय? कोणत्या पालिका महायुती एकत्र लढणार? आणि कोणत्या पालिकेत स्वतंत्र ? पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून.
Corporation Election
Mahayuti’s election strategy revealed — united in Mumbai, divided in rest of Maharashtra; seat-sharing sparks internal tension.saamtv
Published On
Summary
  • स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी महायुतीची रणनिती ठरवली आहे.

  • मुंबईत महायुतीचे तीनही पक्ष एकत्र लढणार असल्याची माहिती.

  • निवडणुकीपूर्वी महायुतीत अंतर्गत धुसफूस वाढत आहेत.

स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांच्या पार्श्वभुमीवर राजकीय वातावरणही चांगलचं तापलयं. एकीकडे महायुती म्हणून एकत्र निवडणूक लढण्याची घोषणा केली जात असली तरी महायुतीतील अंतर्गत धुसफूस मात्र थांबताना दिसत नाही. ठाणे, नवी मुंबईसह 19 ठिकाणच्या पालिका निवडणुकीत जागावाटपावरून महायुतीत मतभेद होतायत.त्यामुळे जागावाटपावर तोडगा निघाला नाही तर राज्यातील सत्तेचे वाटेकरी असलेले हे मित्रपक्षच एकमेकांना भिडणार आहेत..महायुतीत कोणत्या जागांवरून वाद आहे. पाहूयात.

Corporation Election
Solapur Politics: 'ऑपरेशन लोटस'ला धक्का; इनकमिंगला भाजपमधून विरोध, देशमुख-माने संघर्ष चव्हाट्यावर

महायुतीत या ठिकाणी मतभेद

महायुतीत ठाणे,नवी मुंबई, कल्याण-डोंबिवली, मिरा-भाईंदर, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, सांगली या जागांवर मतभेद आहेत. त्याशिवाय सातारा,मावळ,लोणावळा, रायगड,नाशिक, जळगाव,धुळे,हिंगोली,

नांदेड, अहिल्यानगर आणि नंदुरबार या जागांवरही महायुतीत जागावाटपावरून धुसफुस समोर आलीय. दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी मात्र अंतर्गत वादाच्या चर्चांना फेटाळून लावत महायुती म्हणूनच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांना समोरे जाणार असल्याचं सांगितलयं.

Corporation Election
मोठी बातमी! रवींद्र धंगेकरांची शिंदेसेनेतून हकालपट्टी होणार?

एकीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जिल्हानिहाय बैठका होणार असून त्याच्या आधारावरच महायुती आपली पुढची रणनिती ठरवणार असल्यांच सांगितल जातंय..तर दुसरीकडे विरोधकांना फायदा होऊ नये यासाठी महायुती मुंबईत एकत्र लढणार तर राज्यातील काही ठिकाणी निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरं जाऊन नंतर एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

एकीकडे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या जिल्हानिहाय बैठका होणार असून त्याच्या आधारावरच महायुती आपली पुढची रणनिती ठरवणार असल्यांच सांगितल जातंय. तर दुसरीकडे विरोधकांना फायदा होऊ नये यासाठी महायुती मुंबईत एकत्र लढणार तर राज्यातील काही ठिकाणी निवडणुकीला स्वतंत्रपणे सामोरं जाऊन नंतर एकत्र येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com