Sanjay Raut News SAAM TV
महाराष्ट्र

Sanjay Raut News: गँगस्टर अतिक- अशरफच्या हत्या प्रकरणावर संजय राऊतांची प्रतिक्रिया; म्हणाले, पोलिसांच्या उपस्थितीत...

Sanjay Raut News: गँगस्टर अतिक- अशरफच्या हत्या प्रकरणावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. 'पोलिसांच्या समोर हत्या होणे गंभीर आहे, असे राऊत म्हणाले.

साम टिव्ही ब्युरो

Sanjay Raut News: गँगस्टर अतिक अहमद (Atiq Ahmed) आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद यांची गोळी झाडून हत्या झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये खळबळ उडाली आहे. या हत्या प्रकरणावर विरोधकांकडून अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या हत्या प्रकरणावर संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. 'पोलिसांच्या समोर हत्या होणे गंभीर आहे, असे राऊत म्हणाले. (Latest Marathi News)

संजय राऊत म्हणाले, 'प्रयागराजमध्ये कुख्यात गँगस्टर अतीक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ अहमद या दोघांची हत्या झाल्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये १४४ लागू करण्यात आला आहे . तेथील स्थिती सांभाळण्यासाठी उत्तर प्रदेशमधील सरकार सक्षम आहे. पोलिसांच्या समोर हत्या होणे गंभीर आहे. त्याच्या मुलाचा एनकाउंटर झाला, त्याचं काही वाटलं नाही. असे एनकाउंटर मुंबईत देखील झाले आहे'.

' पोलिसांच्या बंदोबस्तात हत्या होत असेल तर यामुळे कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न निर्माण होत आहे. गुंडगिरी मोडून काढण्यासाठी मुंबई, महाराष्ट्रात देखील एनकाउंटर झाले आहेत. कायदा सुव्यस्था राखण्यासाठी केलं जातं. पोलीस बंदोबस्तात हत्या होत असेल तर कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न चिन्ह निर्माण होते, असेही राऊत म्हणाले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने समन्स जारी केलंय, आज त्यांची चौकशी होणार आहे. यावर भाष्य करताना राऊत म्हणाले, या नीतीचे आम्ही पीडित आहोत. महाराष्ट्र , बिहार , पश्चिम बंगाल, दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये या नीतीचे पीडित आहेत. जे सरकारच्या विरोधात बोलतात, त्यांच्या मागे एजन्सी लावली जाते. आमच्या सारख्या लोकांना लगेच चौकशी होते, अटकही केली जाते'.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पुणे-मुंबई हायवे जाम, एसटीच्या कोणत्या अन् किती फेऱ्या रद्द झाल्या? वाचा

Maharashtra Live News Update: गोरेगावमध्ये लिफ्टमध्ये हायड्रोजन गॅसचे फुगे, मोठा अपघात टळला

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे जाम, प्रवाशांचे हाल; प्रशासन IRB कुठे गायब? VIDEO

विमानाचा दरवाजा उघडलेला, निळी पँट घातलेला माणूस; सरपंचाने सांगितला अजितदादांच्या विमान अपघाताचा थरार

Border 2 OTT: बॉर्डर 2 कोणत्या OTT वर पाहता येणार? लगेचच वाचा...

SCROLL FOR NEXT