मयुर राणे, मुंबई|ता. २ ऑगस्ट २०२४
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या गाडीवरील हल्ल्यानंतर राज्याचे राजकारण तापले आहे. यावरुन बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. यावेळी बोलताना त्यांनी नव्या संसद भवनाला लागलेल्या गळतीवरुनही मोदी सरकारवर तोफ डागली.
काय म्हणाले संजय राऊत?
"महाराष्ट्र हे शांतताप्रिय राज्य म्हणून ओळखले जाते. कायदा व सुवस्थेबाबत महाराष्ट्राची दिल्लीमध्ये ओळख होती. मात्र मोदीजी आल्यापासून राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे. राज्यातील सत्ता गुजरात आणि दिल्लीमधून कंट्रोल केली जाते. राज्यात घटनाबाह्य व्यक्तीला सत्तेत बसवले आहे ते गुंडगिरी करणार आणि त्याचे समर्थनही करतील. भाजपशासित राज्यांमध्ये लोकशाही राहिली नाही," असे संजय राऊत म्हणाले.
अमोल मिटकरी, आव्हाडांवरील हल्ल्यावरुन संतापले!
"लोकप्रतिनिधींवर अशा प्रकारे हल्ले करत असतील आणि त्या हल्याला सरकारचा समर्थन असेल सरकार मुखदर्शक बनत असेल तर या राज्यामध्ये घटनाबाह्य सरकार आहेत पण ते गुंडगिरीला पोसणार सरकार आहे आणि या गुंडगिरीची नियंत्रण दिल्ली आणि गुजरातमधून होत आहे हे स्पष्टपणे दिसत आहे," असा घणाघात राऊत यांनी केला.
संसदेच्या गळतीवरुन बरसले!
"आधी राम मंदिराला गळती लागली आता संसद भवनाला गळती लागली. गरज नसताना नवी संसद उभारली, जवळच्या माणसांना त्याची कंत्राटे दिली. हा हिशोब जो ठेकेदारांना दिला आहे तो हिशोब परत झाला पाहिजे. ठेकेदार कोण होते? ते कोणत्या राज्याची प्रभावी होते हे एकदा समोर आले पाहिजे," असे म्हणत संजय राऊत यांनी मोदी सरकारवर जोरदार टीका केली.
"लाडक्या बहीण योजनेतील फसवणूक निवडणुकीचे दोन महिने आहेत. त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही त्या लाडक्या बहीण ची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे एकनाथ शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस असतील, अजित पवार असतील यांना लाडक्या बहिणीच्या जो उमाळा आलेला आहे हा निवडणुका पुरता आला आहे. दोन महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील महाराष्ट्रात कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर पळून जातील.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.