Sanjay Raut News: पत्राचाळ घोटाळा प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यावर आरोप करण्यात आलेत. सध्या राऊत जामिनावर बाहेर आहेत. अशात ईडीने मुंबई उच्च न्यायालयात पुन्हा एकदा संजय राऊतांविरोधात आरोप केला आहे. प्रवीण राऊतांच्या माध्यामातून पत्राचाळ घोटाळ्यातील काळापैसा संजय राऊतांपर्यंत पोहचला असा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे. (Latest Marathi News)
या बाबत अधिक माहिती अशी की, कथित पत्राचाळ घोटाळा प्रकरणी प्रवीण राऊतांच्या माध्यामातून पत्राचाळ घोटाळ्यातील संजय राऊतांपर्यंत काळापैसा पोहचला जात होता. प्रवीण राऊत हे संजय राऊतांचे फ्रंट मॅन आहेत. आसा आरोप मुंबई उच्च न्यायालयात ईडीमार्फत करण्यात आला आहे.
जामीन रद्द करण्यासाठी ईडीची उच्च न्यायालयात याचिका
पत्राचाळ घोटाळा प्रकरणी संजय राऊत आणि प्रवीण राऊतांचा जामीन रद्द करण्यासाठी ईडीने उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. मात्र ईडीनं गुरूवारी हायकोर्टात सादर केलेले EOW चे आरोपपत्र ईडीच्या केसचा भागच नसल्याचं राऊतांच्या वकिलांनी म्हटलं आहे. तसेच वकिलांकडून यावर कायदेशीर आक्षेप घेण्यात आला आहे. सोमवारपर्यंत पत्राचाळ घोटाळा प्रकरणी सुनावणी तहकूब करण्यात आली आहे.
संजय राऊत तब्बल १०४ दिवस होते कारागृहात
दरम्यान, या प्रकरणी ऑगस्ट महिन्यात अटक झाल्यानंतर संजय राऊत (Sanjay Raut) यांना तब्बल १०४ दिवस कारागृहात रहावे लागले होते. संजय राऊतांना जमीन मंजूर करताना कोर्टानं, तपास यंत्रणा ईडीवर कडक शब्दात ताशेरे ओढले होते.
संजय राऊत (Sanjay Raut) यांनी १०३४ कोटींचा कथित पत्राचाळ घोटाळा केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणात संजय राऊतांसह प्रवीण राऊत, राकेश आणी सारंग वाधवान यांवर आरोप आहेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.