Pune Crime News: महाराष्ट्र बँकेत 1 कोटी 73 लाखांचा अपहार; दौंड तालुक्यातील शाखेतील धक्कादायक प्रकार उघडकीस

Pune Crime News: महाराष्ट्र बँकेत बनावट मुदत ठेव प्रमाणपत्र, पावत्या आणि दस्ताऐवज तयार करून अपहार केल्याचा धक्कादायक केला आहे.
Pune Crime News
Pune Crime NewsSaam tv
Published On

Pune Crime News: महाराष्ट्र बँकेच्या दौंड तालुक्यातील गोपाळवाडी शाखेत कंत्राटी मदतनीसाने अपहार केला आहे. कंत्राटी मदतनीसाने ठेवीदार आणि खातेदारांच्या खात्यांमधून एकूण १ कोटी ७३ लाखांचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बँक अधिकाऱ्यांच्या कॉम्प्युटरचा पासवर्ड वापरून बनावट मुदत ठेव प्रमाणपत्र, पावत्या आणि दस्ताऐवज तयार करून अपहार केल्याचा धक्कादायक केला आहे. (Latest Marathi News)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परशुराम तुकाराम भागवत असे कंत्राटी मदतनीसाचे नाव समोर आले आहे. २०१८ ते २० जुलै २०२३ या कालावधीत परशुराम भागवतने अपहार केला. त्याने शाखेतील तत्कालीन अधिकारी व कर्मचारी यांच्या कॉम्पुटरचे यूजर आयडी व पासवर्ड वापरून ठेवीदार आणि खातेदारांची आर्थिक फसवणूक केली आहे.

Pune Crime News
Nagpur Crime News: खळबळजनक! नागपूर मध्यवर्ती कारागृहात गतीमंद कैद्यावर लैंगिक अत्याचार

मुदत ठेव प्रमाणपत्र पुस्तकातील कोऱ्या कागदावर ठेवीदारांची सही घेतली. त्यानंतर ठेवीदारांना त्याची रक्कम व व्याज खात्यात जमा झाल्याचे भासवले, त्यानंतर ठेवीदारांना बनावट पावत्या देऊन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार केला आहे.

कंत्राटी मदतनीसाने ठेवीदारांची फसवणूक कशी केली?

दरम्यान, आरोपी परशुराम याने खातेदारांना बँकेची महा डबल योजना सुरू असल्याचे सांगितले, त्यानंतर गुंतवणूक केल्यास कमी कालावधीत रक्कम दुप्पट होईल, असे सांगून त्यांच्याकडून कोरे धनादेश घेतले. त्यानंतर परशुरामने खातेदारांना बनावट मुदत ठेव प्रमाणपत्र दिले.

तसेच बँकेच्या संगणकीय प्रणालीचा दुरुपयोग करून ठेवीदारांचे मुदत ठेव प्रमाणपत्र संमतीशिवाय परस्पर तोडले. त्यानंतर त्याची रक्कम त्याने स्वतःच्या आणि कुटुंबीयांच्या नावावरील खात्यात जमा केली.

Pune Crime News
Shirdi Crime News : शिर्डीतील वेश्या व्यवसायावर टाच, हाॅटेल्सनंतर पाेलिसांचा बंगल्यावर छापा

दरम्यान, या अपहार प्रकरणी बँकेच्या पुणे पूर्व विभागाचे उप क्षेत्रीय व्यवस्थापक अमितचंदन चौधरी (रा. पुणे) यांनी फिर्याद दाखल केली आहे. परशुराम भागवत याच्याविरुद्ध अपहार करून बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अपहारानंतर आरोपी आणि सहरोपींवर कारवाई करण्याची मागणी ठेवीदार करीत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com