Sanjay Raut Latest News saam tv
महाराष्ट्र

Sanjay Raut: व्हिडिओ 'मविआ'च्या महामोर्चाचा असल्याचा उल्लेख केलाच नाही; टीकेनंतर संजय राऊतांची सारवासारव

शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमुळे नवा राजकीय वाद सुरू झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

Sanjay Raut: शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या व्हिडिओमुळे नवा राजकीय वाद सुरू झाला आहे. संजय राऊत यांनी मराठी क्रांती मोर्चाचा फोटो ट्विट करत महाविकास आघाडीचा महामोर्चा असल्याचे सांगितले होते. यावरुन सत्ताधारी पक्ष तसेच मराठा क्रांती मोर्चा समितीने जोरदार टिका केली होती. या व्हिडिओबद्दल आता संजय राऊत यांनी स्वतः खुलासा करत महाविकास आघाडीचा व्हिडिओ असल्याचा उल्लेखचचं केला नव्हता अशी सारवासारव केली आहे.

शनिवार (१७, डिसेबर) रोजी महाविकास आघाडीकडून (mahavikas Aghadi) काढण्यात आलेल्या मोर्चाला गर्दीच नव्हती असा आरोप सत्ताधारी पक्षांनी केला होता. त्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी एक व्हिडिओ ट्विट करत महाविकास आघाडीचा महामोर्चामधील गर्दी दाखवली होती. मात्र तो व्हिडिओ मराठा क्रांती मोर्चामधील असल्याचा दावा करण्यात येत आहे.

यावर संजय राऊत यांनी खुलासा केला. ज्यामध्ये ते म्हणाले की "ट्विट केलेला व्हिडिओ महामोर्चामधील असल्याचा मी उल्लेखच केला नाही. तो मोर्चाही आमचाच होता. असे मोर्चे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी निघाले. मात्र त्या मोर्चालाही भाजपा नॅनो मोर्चा म्हणत होते. त्यामुळे भाजपाला (BJP) इतकी टिका करण्याच काहीच कारण नाही. मी माझ्या ट्विटमध्ये कोठेही हा महाविकास आघाडीचा महामोर्चा असल्याचा उल्लेख केला नाही."

यावेळी संजय राऊत यांनी सत्ताधारी भाजपा सरकारवर जोरदार टिका केली. 'भाजपने छत्रपतींच्या नादाला लागू नये. आपण सगळे महाराजांचे मावळे आहोत. त्यांचा अपमान होत असताना योग्य ती भूमिका घेणे गरजचे आहे. जशास तसे उत्तर देता यायला हवं," असंही ते यावेळी म्हणाले.

भाजप दडपशाहीचे राजकारण करत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. "विरोधकांना बोलू दिले जात नसेल तर राज्यकर्त्यांना राज्य करण्याचा अधिकार नाही,"असेही ते म्हणाले. यावेळी महाराष्ट्र कर्नाटक सीमावादावर बोलताना त्यांनी "बेळगाव मुद्यावर आता जशास तसं उत्तर देऊ म्हणणा-यांची तोंड बंद का झाली?" असा प्रश्न उपस्थित करत आता जैसे थे परिस्थिती राहिलेली नाही असेही ते म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

चतुरस्र अभिनेता-दिग्दर्शक काळाच्या पडद्याआड; चित्रपटसृष्टीवर शोककळा, ५ दशकांत ६०० हून अधिक चित्रपटांत केलं होतं काम

Maharashtra News Live Update: Mumbai: रायगडच्या खालापुरमध्ये लागल्या वाहनांच्या रांगा

रायगडमध्ये राष्ट्रवादीला मोठा धक्का; सुनील तटकरेंच्या समर्थकांचा शिवसेनेत प्रवेश

तटकरे जन्माला आले तेव्हाच...; शिंदेसेनेच्या आमदाराची जीभ घसरली, काय म्हणाले? पाहा व्हिडिओ

Natural Plants : घरात डास, माश्या आणि मुंग्यांचा त्रास होतोय? लावा ही ५ रोपे आणि कीटकांना ठेवा दूर

SCROLL FOR NEXT