Sanjay Raut News Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut: 'पंतप्रधान मोदींनी जरांगे पाटलांना फोन केला पाहिजे': संजय राऊत

Sanjay Raut On Maratha Aarakshan: एक एक तास मन की बातमध्ये बोलतात, पण महाराष्ट्रातील जरांगे पाटलांशी संवाद साधायला त्यांना अजिबात वेळ नाही, अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे.

Ruchika Jadhav

Sanjay Raut News:

कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे. मराठ्यांना आरक्षण देणे हे केंद्र सरकारच्याच हातात आहे. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रचारात गुंतलेत आणि महाराष्ट्र पेटलेला आहे.जरांगे पाटलांचे प्राण पणाला लागले आहेत. त्यांना काही झालं तर महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत संजय राऊतांनी राज्य सरकारसह पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

'जरांगेंना काही झालं तर, महाराष्ट्र पेटेल आणि त्यांना महाराष्ट्र पेटवायचाय का? त्यासाठीच हे सगळं चाललंय का?', असा प्रश्न संजय राऊतांनी उपस्थित केलाय. पंतप्रधानांनी मनोज जरांगे पाटलांशी किमान फोनवरून तरी संवाद साधलापाहिजे. ते एक एक तास मन की बातमध्ये बोलतात, पण महाराष्ट्रातील जरांगे पाटलांशी संवाद साधायला त्यांना अजिबात वेळ नाही, अशी टीका देखील संजय राऊतांनी केली आहे.

खुर्ची वाचवण्यासाठी फडणवीस दिल्ली दौऱ्यावर

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणासाठी दिल्ली दौऱ्यावर गेले नाहीत. तर, ते आपली आणि मुख्यमंत्र्यांची खुर्ची वाचवण्यासाठी दिल्ली दौऱ्यावर गेलेत, असं संजय राऊत म्हणाले.

महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातील आर्धे मंत्री असे आहेत जे तुरूंगात असायला हवेत. आसाम, उत्तरप्रदेशमधिल भाजपच्या मंत्र्यांवर कोणतीही कारवाई होत नाही, मात्र विरोधीपक्षातील मंत्र्यांवर कारवाई केली जाते. त्यामुळे ममता बॅनर्जी म्हणतात ते खरं आहे. हा देश एकदा रिकामा करा आणि निवडणूक घ्या, असंही संजय राऊत यावेळी म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

केस लवकर वाढवण्यासाठी सकाळी की रात्री तेल कधी लावावे? योग्य वेळ काय?

Maharashtra News Live Update: पुण्यात भर पावसात काँग्रेसचं आंदोलन

Ladki Bahin Yojana : रक्षाबंधनाआधी लाडक्या बहिणींना मोठा धक्का! ₹1,500 अचानक बंद? सरकारकडून स्पष्टीकरण

High Blood Pressure : हाय बीपीच्या रुग्णांसाठी कोणती भाजी, फळ अन् पीठ सुपरहेल्दी?

CJP Protest: सत्ताधाऱ्यांमध्ये कुणी पाकिस्तानी आहे का? उद्धव ठाकरेंचा मोदी सरकारला खोचक टोला

SCROLL FOR NEXT