महाराष्ट्र

Sanjay Raut Meet Satya Pal Malik: पुलवामा हल्ला प्रकरणाचा वाद पेटण्याची चिन्हे! संजय राऊत सत्यपाल मलिकांच्या भेटीला; म्हणाले..

Rashmi Puranik

Delhi News: गेल्या काही दिवसांपासून काश्मिरमधील (Kasmir) पुलवामा हल्ला प्रकरण चांगलेच चर्चेत आले आहे. काश्मिरचे तत्कालीन राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी या प्रकरणावरुन पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारवर गंभीर आरोप केले होते. ज्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. याच पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी सत्यपाल मलिक यांची दिल्लीमध्ये भेट घेतली आहे. (Latest Marathi News)

याबाबत अधिक माहिती अशी की, ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) आज जम्मू आणि काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची भेट घेतली. दिल्लीमधील सत्यपाल मलिक यांच्या निवासस्थानी ही भेट घेतली. या भेटीमध्ये दोन्ही नेत्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा झाली असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या भेटीला महत्त्व प्राप्त झाले आहे.

तसेच या भेटीमध्ये खासदार संजय राऊत यांनी मलिक यांना मुंबई दौऱ्याचं निमंत्रण राऊत देणार आहेत, तसंच या दौऱ्यात मातोश्रीवर येण्याचं निमंत्रणही दिल्याचे समोर आले आहे. या भेटीबद्दल बोलताना संजय राऊत यांनी "भविष्यात परिवर्तन कसं आणता येईल, त्यात त्यांचे योगदान काय असेल" यावर चर्चा करण्यात आल्याचे सांगितले आहे.

लवकरच महाराष्ट्र दौरा...

या भेटीबद्दल बोलताना संजय राऊत म्हणाले की, "सत्यपाल मलिक यांनी राष्ट्रीय सुरक्षे संदर्भात काही माहिती समोर आणलीय. त्यांनी पुलवामा बाबत परखड सत्य सांगितलं आहे. त्याचा काय पुरावा आहे. भगत सिंग कोशारींचे वक्तव्य गांभीर्याने घेतले जाते. त्यांचे निर्णय सत्य मानले जातात. पण सत्यपाल मलिकांच्या भूमिका सत्य नाही का? असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.

काय म्हणाले होते सत्यपाल मलिक...

पुलवामा हल्ल्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालय आणि सीआरपीएफ व्यवस्थापन असे दोघे जबाबदार असल्याचं सत्यपाल मलिक म्हणाले होते. “सीआरपीएफनं केंद्रीय गृहमंत्रालयाकडे एअरक्राफ्टची मागणी केली होती.पण त्यांनी नकार दिला. मला जर त्यांनी विचारणा केली असती, मी त्याच संध्याकाळी पंतप्रधानांना सांगितलं की पुलवामा आपल्या चुकीमुळे घडलंय. आपण जर त्यांना एअरक्राफ्ट दिलं असतं, तर हे घडलं नसतं. तर त्यांनी मला तुम्ही आत्ता शांत राहा असे म्हणाल्याचाही गौप्यस्फोट त्यांनी केला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jamner Crime : नशेत मुलाने केला पित्याचा खून; दारूसाठी पैसे देण्यास वडिलांनी नकार दिल्याने कृत्य

Health Tips: जेवणानंतर तुम्हालाही आहे का चहा पिण्याची सवय? त्याआधी हे वाचाच

Relationship Tips : तुम्हीही लग्नासाठी उतावळे झालात; कमी वयात विवाह करण्याचे तोटे माहितीयेत का?

Manoj jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती बिघडली; दौरा अर्धवट सोडून रुग्णालयात दाखल

Cucumber Benefits: चेहऱ्यावरील पिंपल्सपासून सुटका मिळवण्यासाठी रामबाण उपाय; एकदा करुन बघाच

SCROLL FOR NEXT