Relationship Tips : तुम्हीही लग्नासाठी उतावळे झालात; कमी वयात विवाह करण्याचे तोटे माहितीयेत का?

Early Marriage Disadvantages : कुटुंबीयांच्याविरोधात जाऊन दोघेही एकमेकांशी विवाह करतात. मात्र कमी वयात विविह केल्याने दोघांच्याही आयुष्यातील अनेक गोष्टींच नुकनास होते. त्या गोष्टी कोणत्या या बाबत अधिक माहिती जाणून घेऊ.
Relationship Tips
Relationship TipsSaam TV

प्रेमाला वयाचं, पैशांचं आणि कशाचंच बंधन नसतं, असं तुम्ही सर्वांनी ऐकलं असेल आणि पाहिलंही असेल. प्रेमात पडल्यानंतर अनेक प्रेमीयुगुल आपल्या जोडीदाराचा विरह सहन करत नाहीत. त्यांना कायम एकत्र रहावं असं वाटतं. त्यामुळे कुटुंबीयांच्याविरोधात जाऊन दोघेही एकमेकांशी विवाह करतात. मात्र कमी वयात विविह केल्याने दोघांच्याही आयुष्यातील अनेक गोष्टींचं नुकनास होते. त्या गोष्टी कोणत्या याबाबत अधिक माहिती जाणून घेऊ.

Relationship Tips
UP Marriage Fraud: सामूहिक विवाह सोहळ्यात अजब प्रकार, चक्क बहिणीने भावासोबत केले लग्न; संतापजनक कारण समोर

जबाबदाऱ्या वाढतात

कमी वयात म्हणजे अगदी १८ आणि २० व्या वयात लग्न केल्यावर फार कमी वयात आपल्यावर असलेल्या जबाबदाऱ्या आणखी वाढतात. त्यामुळे कमी वयात लग्न करणे टाळा. आपल्याला आपल्या पत्नीला कायम सोबत ठेवावे लागते. बाहेर फिरताना मजा मस्ती करताना कायम पतीची परवानगी घ्यावी लागते. शिवाय नात्यांच्या जबाबदरीने आपलं आयुष्य जगायचं राहून जातं.

आर्थिक भार वाढतो

व्यक्ती जेव्हा एकटा असतो तेव्हा त्याच्या खर्च तितकासा जास्त नसतो. कमी वयात लग्न केल्याने आर्थिक भार देखील वाढतो. स्वत:चं वेगळं घर, संसार या सर्व गोष्टींचा खर्च, तसेच रोजच्या जीवनातील खाण्यापिण्याचा खर्च हा सर्व भार दोघांच्याही खांद्यावर येतो.

मुलांचं नीट संगोपन होत नाही

कमी वयात लग्न केल्यावर त्यांना मुलं देखील कमी वयातच होतात. त्यामुळे मुलांना वाढवताना त्यांचं रडणं, चिडिचिड करणं आवडत नाही. यामुळे त्या माता-पित्याची देखील चिडचिड होते. कमी वयात लग्न करणाऱ्या कपल्सला जास्त अनुभव किंवा ज्ञान नसते. त्यामुळे मुलांचं संगोपन नीट होत नाही.

अर्धवट शिक्षण

शिक्षण अर्धवट राहणं ही फार मोठी हानी आहे. कमी वयात लग्न केल्यावर दोघांवर मोठी आर्थिक जबाबदारी येते. त्यामुळे दोघेही आपलं शिक्षण आर्ध्यातच सोडतात. नंतर शिक्षण पूर्ण करायचं म्हटलं तर आर्थिक भार वाढलेला असतो आणि संसार देखील वाढलेला असतो. त्यामुळे कमी वयात लग्न करू नये.

टीप :ही फक्त सामान्य माहिती आहे. साम टीव्ही कमी वयातील लग्नाच्या तोट्यांचा दावा करत नाही.

Relationship Tips
Marriage Tips: लग्नाआधी जोडीदाराला विचारा या गोष्टी, नाहीतर...

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com