Mumbai News: BMS विद्यार्थी मृत्यू प्रकरण! चौकशीसाठी कमिटीची स्थापना, विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर Poddar College चा निर्णय

Latest News: विद्यार्थ्यांनी सकाळपासून जोरदार आंदोलन करत ओपीडी बंद पाडली आणि दोषींविरोधात कारवाईची मागणी केली होती.
Poddar Hospital student protest
Poddar Hospital student protestSaam Tv
Published On

सूरज सावंत, मुंबई

Mumbai News: मुंबईतल्या वरळी येथील पोद्दार रुग्णालयामध्ये (Poddar Hospital) बीएमएसच्या विद्यार्थ्याचा (BMS Student) उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याचा आरोप पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यायातील विद्यार्थ्यांनी केला आहे. संतप्त झालेल्या विद्यार्थ्यांनी रुग्णालयातील ओपीडी बंद करत संबंधितांवर कारवाईची मागणी केली. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाने या प्रकरणी एक समिती स्थापन करुन 10 दिवसांत त्याचा अहवाल समोर आल्यानंतर दोषींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली.

Poddar Hospital student protest
India Coronavirus Update: कोरोनाने पुन्हा धरला वेग! देशात गेल्या 24 तासांत 9,355 नवीन रुग्णांची नोंद, 29 जणांचा मृत्यू

वरळीच्या पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यायात दयानंद काळे ( 22 वर्षे) बीएमएसचे शिक्षण घेत होता. दयानंद काळे हा बुधवारी रात्री साडेदहाच्या सुमारास हॉलीबॉल खेळून झाल्यानंतर मैदानाच्या शेजारी असलेल्या आंब्यांच्या झाडाची फांदी ही शेजारी असलेल्या अशोकाच्या झाडाजवळ असल्याने कैऱ्या काढण्यासाठी झाडावर चढला.

पण त्याने पाय दिलेली फांदी तुटलयाने त्याचा तोल गेला आणि तो अंदाजे 35 ते 40 फुटावरुन खाली डोक्यावर पडला. त्यामुळे मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. दयानंदच्या मित्रांनी त्याला तात्काळ पोद्दार महाविद्यालयाच्या रुग्णालयामध्ये नेले. पण दयानंदवर योग्य उपचार न झाल्याने त्याचा मृत्यू प्रशासकिय हलगर्जीपणामुळे झाल्याचा आरोप त्याच्या मित्रांनी केला.

Poddar Hospital student protest
Mumbai Pune Expressway Accindent: मोठी बातमी! मुंबई- पुणे एक्सप्रेस वेवर भीषण अपघात; तब्बल ११ गाड्या एकमेकांवर आदळल्या

बीएमएस विद्यार्थी दयानंद काळेच्या मृत्यूनंतर विद्यार्थी आक्रमक झाले होते. या विद्यार्थ्यांनी वरळीच्या पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये सकाळी आठ वाजल्यापासून आंदोलन सुरु केले होते. मृत्यू झालेल्या दयानंद काळे या विद्यार्थ्याला आर्थिक मदत देण्यात यावी. त्यासोबत या घटनेला जबाबदार असणाऱ्या लोकांवर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी दयानंद काळेच्या सहकारी विद्यार्थ्यांकडून करण्यात आलेली होती.

या संपूर्ण आंदोलनामध्ये पोद्दार महाविद्यालयाचे विद्यार्थी सहभागी झाले होते. आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यानंतर आंदोलक विद्यार्थी आणि महाविद्यालय प्रशासन यांच्यात बैठक झाली. या बैठकित झालेल्या चर्चेतून अखेर मार्ग निघाला.

या घटनेसंदर्भात महाविद्यालय प्रशासनाकडून एक कमिटी स्थापन करण्यात येणार आहे. त्या कमिटीद्वारे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्यात येणार आहे आणि दोषींवर कारवाई देखील करण्यात येणार असल्याचे आश्वासन महाविद्यालय प्रशासनाकडून देण्यात आले. या आश्वासनानंतर विद्यार्थ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतले आहे.

Poddar Hospital student protest
Uddhav Thackeray Latest Speech : आताचं सरकार हे काम'गार' करणारं सरकार, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

या प्रकराविरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून महाविद्यालय संचालकांनी दिलेले आश्वासन जर का पाळले नाही, तसंच दोषींवर कुठली कारवाई झाली नाही? तर पुन्हा एकदा आंदोलन केले जाईल, असा इशारा बीएमएसच्या विद्यार्थ्यांनी दिला आहे.

दरम्यान, पोद्दार आयुर्वेदिक महाविद्यायामध्ये बीएमएसचे शिक्षण घेणारा विद्यार्थी दयानंद काळे ( 22 वर्षे) याचा मृत्यू झाला आहे. दयानंद काळे हा बुधवारी रात्री झाडावरुन पडून जखमी झाला होता. त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. पोद्दार रुग्णालयामध्येच उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com