India Coronavirus Update: कोरोनाने पुन्हा धरला वेग! देशात गेल्या 24 तासांत 9,355 नवीन रुग्णांची नोंद, 29 जणांचा मृत्यू

Latest News: सध्या देशामध्ये सक्रीय रुग्णांचा आकडा 57,410 वर पोहचला आहे.
India Corona Update
India Corona UpdateSaam Tv
Published On

Delhi News: देशामध्ये कोरोनामुळे (Corona Virus) पुन्हा भीती वाढली आहे. गेल्या दोन दिवसांत कोरोना रुग्णांच्या (Corona Patient) संख्येत घट पाहायला मिळाली होती. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला होता. पण आता कोरोनाने पुन्हा वेग धरला आहे. कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली आहे. देशात गेल्या 24 तासांत 9,355 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे.

India Corona Update
Sanjay Raut News : शरद पवारांच्या भाकरी फिरवण्याच्या वक्तव्यावर संजय राऊत यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने गुरुवारी जारी केलेल्या नव्या आकडेवारीनुसार, भारतात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 9,355 नवीन रुग्ण आढळले आहेत. तर 26 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यासोबतच देशात कोरोनामुळे जीव गमावलेल्या रुग्णांची संख्या 5,31,424 वर पोहचली आहे. सध्या देशामध्ये सक्रीय रुग्णांचा आकडा 57,410 वर पोहचला आहे. तर देशात आतापर्यंत 4,43,35,977 रग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

India Corona Update
Petrol Diesel Price: कच्च्या तेलाच्या किमतीत पुन्हा वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील इंधनाचे दर

बुधवारी आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, देशामध्ये 9,629 रुग्ण आढळले होते. आज समोर आलेली कोरोना रुग्णांची आकडेवारी ही कालच्या कोरोना रुग्णांच्या आकडेवारीच्या तुलनेत किंचित कमी आहे. देशातील दैनिक पॉझिटिव्ह रेट 4.08 टक्के आणि साप्ताहिक पॉझिटिव्ह रेट 5.36 टक्के नोंदविला गेला आहे. आतापर्यंत देशात कोरोना लसीचे एकूण 220,66,54,444 डोस देण्यात आले आहेत. यामध्ये गेल्या 24 तासांत 4 हजार 358 लोकांना लसीकरण करण्यात आले.

India Corona Update
Unique Love Story : प्रेम आंधळं असतं, पण इतकं?; तरुणी बॉयफ्रेंडच्या वडिलांसोबतच गेली पळून, वर्षभरानंतर...

दरम्यान, महाराष्ट्रात देखील कोरोना वेगाने पसरत आहे. गेल्या 24 तासांत राज्यामध्ये 784 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. एकट्या मुंबईमध्ये 185 रुग्ण आढळले आहेत. तर राज्यात एका कोरोना रुग्णाचा मृत्यू झाला आहे. राज्यातील आतापर्यंत 81,63,625 नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर कोरोनामुळे मृत झालेल्या रुग्णांचा आकडा 1,48,508 वर पोहचला आहे. राज्यातील कोविड डेट रेट 1.81 टक्के ऐवढा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com