Sanjay Raut On Election Commission 
महाराष्ट्र

Sanjay Raut: निवडणूक आयोग भाजपची शाखा; ठाकरेंविरोधात तक्रार होताच आयोगावर संजय राऊतांची टीका

Sanjay Raut On Election Commission : निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याने ठाकरे अडचणीत येणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान आयोगाच्या या कार्यपद्धतीवर संजय राऊतांनी सडकून टीका केलीय.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

गिरीश कांबळे, साम प्रतिनिधी

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरेंविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीवरुन संजय राऊत यांनी आयोगावर हल्लाबोल केलाय. ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते त्यावेळी त्यांनी आयोगावर सडकून टीका केलीय. निवडणूक आयोगाकडे उद्धव ठाकरेंविरोधात करण्यात आलेल्या तक्रारीवरुन निवडणूक आयोगावर हल्लाबोल करताना आयोग हे भाजपचीच शाखा असल्याची टीका राऊतांनी केलीय.

लोकसभा निवडणुकांसाठी मतदान चालू असताना उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले होते. त्यावरून निवडणूक आयोगात उद्धव ठाकरेंविरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता आहे. ठाकरेंवर कारवाई करावी, असे आदेश केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्य आयोगाला दिलीय. आमच्या पक्ष कार्यालयाकडून निवडणूक आयोगाला 17 पत्र पाठवले आहेत. तक्रारी आहेत,सूचना आहेत मात्र निवडणूक आयोगाने त्यांची दखल घेतली नाही असं संजय राऊत म्हणालेत.

भाजपच्या घोषणांवर कारवाई केली जात नाही मात्र पत्रकार परिषद घेतली म्हणून कारवाई केली जात असल्याचा आरोप राऊत यांनी यावेळी केला. आयोगाने ठाकरेंच्या पत्रकार परिषदेवर आक्षेप घेतल्यानंतर राऊतांनी केंद्रीय निवडणूक आयोगावर सडकून टीका केलीय. संजय राऊत यांनी यावेळी अमित शहा यांच्या प्रचार सभा आणि मोदींच्या ध्यान धारणांवरही तोंडसूख घेतलं.

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात भाजपला मतदान करा तुम्हाला राम दर्शन मोफत घडवू अशी ऑफर अमित शहा देतात.त्याप्रकरणी आम्ही निवडणूक आयोगाला पत्र पाठवलं आहे. मात्र त्यावर कोणतीच कारवाई करण्यात आलीय. तर मतदान चालू असताना पंतप्रधान मोदी वाराणसीतून केदारनाथ जातात, तेथे धान्यधारणा करतात. तेथे कॅमेरे लावले जातात, त्यावर आयोग काहीच आक्षेप घेत नसल्याचं राऊत म्हणालेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Udhav Thackarey News : 90 हजार बूथवर गुजरातची माणसं, उद्धव ठाकरेंचा भाजपवर गंभीर आरोप

Parenting Tips: पॅरेंटल बर्नआउटचे बळी ठरू शकतात पालक; हे आहे मुख्य कारण

Tiger Life: वाघ किती वर्षे जगतो?

Madhuri Dixit: "श्रीदेवी आणि माझं नातं..." माधुरी दीक्षित दिवगंत अभिनेत्रीविषयी स्पष्टच बोलली

SL vs NZ: टीम इंडियाचा व्हॉईटवॉश करणाऱ्या न्यूझीलंडला श्रीलंकेचा दणका! 12 वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं

SCROLL FOR NEXT