Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut : कसबा तो झाकी है,महाराष्ट्र अभी बाकी है...; आगामी निवडणुकीत किती जागा जिंकणार? संजय राऊतांनी थेट आकडाच सांगितला

पुढच्या निवडणुकीत विधानसभा लोकसभा एकत्र लढणार आहोत.

Ruchika Jadhav

Maharashtra Politics : कसबा आणि चिंचवड या दोन्ही निवडणुकांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं होतं. येथे आलेल्या निकलावरून आगामी निवडणुकांचे अंदाज बांधले जाणार होते. अशात कसब्यातील विजयावरून आगामी विधानसभा निवडणूकीविषयी संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे.त्यांनी आगामी निवडणुकीत त्यांच्या किती जागा येणार याची थेट आकडेवारी सांगितली आहे. एकजूट असल्यास २०२४मध्ये महाविकास आघाडी २०० पेक्षा जास्त जागा जिंकणार आसा विश्वास खारदार संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे. (Latest Sanjay Raut News)

'महाविकास आघाडी म्हणून आम्ही एकत्र राहिलो तर कसबाप्रमाणे निकाल लागतो. जर कोणी बंड केलं तर चिंचवडप्रमाणे निकाल लागतो. महाविकास आघाडीने एकजूट दाखवली तर २०२४ मध्ये विधानसभेत महाविकास आघाडीच्या २०० पेक्षा जास्त जास्त जागा निवडून येतील असं खासदार संजय राऊत यांनी ठामपणे सांगितलं आहे.

कसबा हे राज्यात काय होणार याचं चित्र दाखवणार आहे . मी नाना पटोले यांच्याशी सहमत आहे. पुढच्या निवडणुकीत विधानसभा लोकसभा एकत्र लढणार आहोत. त्यामुळे २०० जागा विधानसभेत आणि ४० जागा लोकसभेत जिंकू, असंही राऊत म्हणाले.

हक्कभंग नोटीसविषयी बोलताना राऊतांनी आजही नोटीसचं पाहिली नसल्याचं म्हटलं आहे. ' मी नोटीस पहिली नाही, मी विधिमंडळाचा आदर करतो.पण नोटीस पहिली नाही.असं राऊत म्हणालेत. अजून राज्यात काही प्रमाणात कायद्याचं राज्य आहे त्यामुळे हक्क भंग - ४० आमदार असे बोलतात त्यावर कारवाई व्हायला हवी, असं संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नाताळ आणि थर्टीफस्ट निमित्त मालवणमध्ये पर्यटक दाखल

कंठ दाटला, डोळ्यात पाणी; नाशिकच्या राड्यानंतर फरांदे स्पष्टच बोलल्या, थेट भाजपची चूक सांगितली

Pushkar Jog: 'माझं घर गेलं...'; मराठमोठ्या अभिनेत्याच्या मुंबईतील फ्लॅटला लागली भीषण आग, थोडक्यात वाचला जीव

Night Skin Care : रात्री झोपताना लावा 'हा' घरगुती फेस मास्क, सकाळी चेहऱ्यावर येईल नॅचरल ग्लो

Mumbai Tourism: 31 डिसेंबरला मुंबईतच पण गर्दी नसलेल्या ठिकाणी फिरायचंय? हे Hidden spots नक्की ट्राय करा

SCROLL FOR NEXT