Sanjay Raut Defamation Case Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut Defamation Case : 'मी ऑफ द रेकॉर्ड काही बोलू का?' मेधा सोमय्या यांची कोर्टात अजब मागणी, न्यायमूर्ती म्हणाले...

Sanjay Raut Latest News: संजय राऊत अब्रूनुकसान प्रकरण, पुढील पुढील सुनावणी 20 एप्रिल रोजी

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

>> सचिन गाड

Sanjay Raut Defamation Case : ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांच्याविरुद्ध भाजप नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. याच प्रकरणी आज मुंबईमधील शिवडी कोर्टात सुनावणी पार पडली.

यावेळी कोर्टात बोलताना मेधा सोमय्या यांनी न्यायमूर्तींकडे अजब मागणी केली होती. 'मी ऑफ द रेकॉर्ड काही बोलू का?', असं त्या म्हणाल्या होत्या. यावर न्यायमूर्ती मोकाशी यांनी स्पष्ट केलं की, ''इथे ऑफ द रेकॉर्ड काही नसतं.'' याप्रकरणी पुढील सुनावणी 20 एप्रिल रोजी पार पडणार आहे.

सुनावणी दरम्यान संजय राऊत यांचे वकील मनोज पिंगळे यांनी मेधा सोमय्या यांची उलटतपासणी केली. मेधा सोमय्या यांच्या शिक्षणाबद्दल वकिलांनी त्यांना प्रश्न विचारले. राऊतांच्या वकिलांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात मेधा सोमय्या यांनी युवा प्रतिष्ठान या ट्रस्टच्या जनरल सेक्रेटरी असल्याचं मेनी केलं. तसेच सोसायटी वेलफेअर आणि झोपडपट्टी पुनर्वसन यात ट्रस्ट काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं. (Latest Marathi News)

सरकारी कामं घेण्याचा ट्रस्टला अधिकार आहे का? असा प्रश्नही राऊतांच्या वकिलानांनी त्यांना केला.

Sanjay Raut Defamation Case : कोर्टाच्या सुनावणीनंतर राऊत काय म्हणले?

कोर्टाच्या सुनावणी संपल्यानंतर पत्रकारांशी बोलताना संजय राऊत म्हणाले आहेत की, ''जनतेच्या पैशा बाबत जर काही प्रश्न असतील, तर त्यावर प्रश्न विचारानं हे लोकप्रतिनिधी आणि पत्रकारांचा काम आहे. माझा आणि मेधा यांचा जुना परिचय आहे. त्यांना नमस्कार कारण हा संस्कृतीचा भाग आहे. त्या एक प्राध्यापिका आहेत. त्यांना नमस्कार कारण माझं कर्तव्य आहे. त्यांनी जरी माझ्या विरुद्ध खटला दाखल केला असला तरी.''

Sanjay Raut Defamation Case : काय आहे प्रकरण?

संजय राऊत यांनी किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर 100 कोटींचा टॉयलेट घोटाळा केल्याचा आरोप केला होता. यानंतर किरीट सोमय्यांनी संजय राऊत यांनी माफी मागावी कारण त्यांनी मेधा सोमय्या यांचे चरित्र हनन केलं, असं म्हणाले होते. मात्र राऊत यांनी माफी न मागितल्याने त्यांनी राऊतांविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला. ज्यावर आज शिवडी न्यायालयात सुनावणी पार पडली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: केंद्र सरकारचे बजेट हे अत्यंत निराशाजनक आणि हास्यास्पद - यशोमती ठाकूर

Bribery Case : पोलीस अधिकाऱ्याला ६ लाखांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं; लाचलुचपत विभागाची मोठी कारवाई

अजित पवारांचा अपघात की घातपात? राष्ट्रवादीच्या आमदाराने व्यक्त केला संशय, राजकीय वर्तुळात खळबळ

Cancer Medicines: कॅन्सर पेशंटना नवसंजीवनी; जीव वाचवणारी १७ औषधं स्वस्त होणार, अर्थसंकल्पात मोठी घोषणा

...तर अजितदादा माझ्याशी बोलले असते; राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चांवर CM फडणवीसांचं मोठं भाष्य

SCROLL FOR NEXT