Eknath Shinde meets PM Narendra Modi in Delhi; Sanjay Raut claims Shinde Sena will merge with BJP after civic polls. Saam Tv
महाराष्ट्र

Maharashtra Politics: तुमचा पक्ष भाजपात विलीन करावा लागेल, शिंदेंना मोदी-शाहांची तंबी, राऊतांचा दावा

Eknath Shinde Warned By Modi-Shah: दिल्लीत एकनाथ शिंदेंनी मोदींची भेट घेतली.. मात्र या भेटीत महापालिका निवडणुकीनंतर शिंदेसेना भाजपात विलीन करण्याचा आदेश दिल्याचा दावा संजय राऊतांनी केलाय.. मात्र त्यावरुन कसं राजकारण तापलंय?

Bharat Mohalkar

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्ली गाठत पंतप्रधान मोदींची भेट घेतली... या भेटीत मोदी आणि शाहांनी महापालिका निवडणुकीनंतर तुमचा पक्ष भाजपात विलीन करावा लागेल, अशी तंबीच एकनाथ शिंदेंना दिल्याचा खळबळजनक दावा संजय राऊतांनी केलाय...

संजय राऊत एवढ्यावरच थांबले नाहीत. तर शिवसेनेच्या पक्ष आणि चिन्हाची सुनावणी जवळ आली की शिंदेंचे पाय लटपटायला लागतात, असा टोलाही राऊतांनी लगावलाय.. मात्र राऊत संकुचित वृत्तीचे असल्याचा पलटवार शिंदेसेनेनं केलाय.. खरंतर राऊतांनी शिंदेंची शिवसेना भाजपात विलीन करण्यासंदर्भात याआधीही वक्तव्य केलंय.. त्याची नेमकी कारणं काय आहेत?

12 नोव्हेंबरला शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात सुप्रीम कोर्टात सुनावणी

कोर्टाचा निकाल विरोधात गेल्यास नवा पर्याय शोधावा लागणार

सत्तेतील वाटा कायम ठेवण्यासाठी शिंदेंपुढे भाजपात विलीन होण्याचा पर्याय

राज्यात एका बाजूला महायुतीत कुरघोडीचं राजकारण रंगलंय.. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपनं 150 पारचा नारा दिलाय.. तर पुणे, ठाणे, नवी मुंबई महापालिकेसाठी स्वबळाची तयारी सुरु केलीय.. त्यामुळं शिंदेसेना अस्वस्थ असतानाच राऊतांनी शिंदेंची दुखरी नस दाबलीय.. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिंदेसेना विरुद्ध ठाकरेसेना वाद आणखी तीव्र होणार हे मात्र निश्चित....

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

Thane Water Cut: ठाणेकरांसाठी महत्वाची बातमी, ३ जून रोजी पाणीपुरवठा राहणार बंद, कोणकोणत्या भागांना बसणार फटका?

SCROLL FOR NEXT