Sanjay Raut Saam TV
महाराष्ट्र

Sanjay Raut : सुरज परमार यांच्या डायरीतील नावे कुणाची? SIT चौकशी लावा; राऊतांचे सरकारला आव्हान

सुरज परमार आत्महत्येच्या मुद्यावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं आहे.

जयश्री मोरे

Sanjay Raut : ठाण्यातील बिल्डर सुरज परमार यांच्या आत्महत्येचा मुद्दा ठाकरे गटाने चांगलाच लावून धरला आहे. या मुद्द्यावरून खासदार संजय राऊत यांनी सरकारला धारेवर धरलं आहे. सुरज परमार यांची एक डायरी सापडली आहे. या डायरीत काही सांकेतिक नावं आहेत. ही नावे कुणाची आहेत हे आम्हाला माहीत आहे. हिंमत असेल तर याप्रकरणाची एसआयटी चौकशी लावा, असा इशारा संजय राऊत (Sanjay Raut) यांनी सरकारला दिला आहे. (Tajya News)

राज्यपाल महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्रातील महापुरुषांवर वादग्रस्त विधान करतात त्यानंतर देखील भाजप त्यांचं भजन गात आहे. हा काय प्रकार आहे? एसआयटी (SIT) यावरच स्थापन झाली पाहिजे. एसआयटी सुरज परमार यांच्या डायरीवर स्थापन झाली पाहिजे. मात्र, ते तसं करत नाहीत. तेएसआयटी फक्त आमच्यावर होते. इतकं सुडबुद्धीने वागणारं सरकार महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच आलं नाही, असे देखील राऊत म्हणाले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या दिल्ली दौऱ्यावर देखील राऊतांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. शिंद-फडणवीस यांचं हायकमांड दिल्लीत आहे. त्यामुळे त्यांना वारंवार दिल्लीत जावं लागत असेल. त्यावर आम्ही काही बोलणार नाही. त्यांना तिथूनच आदेश घ्यावे लागतात, असा चिमटा काढला.

दिशा सालियन प्रकरण इंटरपोलकडे जरी दिलं तरी हरकत नाही. ज्या विषयाशी शिवसेना आणि आदित्य ठाकरेंचा काडीमात्र संबंध नाही ते महाराष्ट्रच्या विधानसभेत का काढले जातायत?, महाराष्ट्र हिताचे सीमाप्रश्नाचे विषय का नाही. महाराष्ट्र नेत्यांबद्दल शिवराळ भाषा वापरली जाते, आम्हाला देशद्रोही ठरवलं जातं आणि आमचे मुख्यमंत्री दिशा सालियन आणि अन्य विषयात गुंतून पडलेत असे देखील संजय राऊत म्हणाले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

शिवसेना आमदाराच्या पत्नीसमोर चित्रलेखा पाटील म्हणाल्या ५० खोके...; सुरूवातीला बाचाबाची नंतर धक्काबुक्की; VIDEO व्हायरल

Ban Online Betting Games: मोदी सरकारचा आणखी एक स्ट्राईक; ऑनलाइन बेटिंग गेम्सवर आणणार बंदी

Crime: दारूच्या नशेत बायकोवर कुऱ्हाडीने वार, नंतर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या; जळगाव हादरले

Maharashtra Rain: राज्यात पावसाचे धुमशान! रेल्वेसेवेला मोठा फटका, २०-२१ ऑगस्टला लांबपल्ल्याच्या ट्रेन्स रद्द; वाचा लिस्ट

Maharashtra Rain Live News: मुंबईसाठी उद्या पावसाचा ऑरेंज अलर्ट, शाळां-महाविद्यालयांच्या सुट्टीबाबत अद्याप निर्णय नाही: BMC

SCROLL FOR NEXT