Sanjay Raut  
महाराष्ट्र

Shaktipeeth Mahamarg: 'शक्तिपीठ'चे १० हजार कोटी निवडणुकीसाठी वापरले जातील, संजय राऊतांचा गंभीर आरोप

Sanjay Raut On Shaktipeeth Mahamarg: शक्तिपीठ महामार्गाला अनेक राजकीय पक्षांनी विरोध केला आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी २० हजार कोटी रुपये मंजूर झाल्यानंतर ठाकरे गटाचे नेते संजय राऊत चांगलेच संतापले आहेत.

Priya More

शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला मंगळवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी देण्यात आली. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादनासाठी तब्बल २० हजार कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या शक्तिपीठ महामार्गावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. 'महाराष्ट्राची अवस्था खूपच कठीण आहे. सध्या महाराष्ट्राची लूट सुरू आहे.', असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केले.

संजय राऊत यांनी शक्तिपीठ महामार्गावरून सरकारवर जोरदार निशाणा साधला. त्यांनी सांगितले की, 'यावेळी त्यांनी महाराष्ट्राची खूपच कठीण अवस्था केली आहे. सध्या महाराष्ट्राची लूट सुरू आहे. या शक्तीपीठ महामार्गासाठी २० हजार कोटी रुपये मंजूर झाले आहे. या पैशातील १० हजार कोटी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी वापरले जातील.'

संजय राऊत यांनी पुढे सांगितले की, 'राज्यात हे सर्व ड्रीम प्रोजेक्ट ठेकेदारांकडून हजारो कोटी काढण्यासाठी चालले आहे. महाराष्ट्राला याचा किती फायदा होईल की नाही हा पुढचा प्रश्न. सर्वात आधी आपले खिसे भरा, आपल्या बॅगा भरा आणि त्या पैशातून महाराष्ट्राच्या राजकारणाला ब्लॅक मनीतून खरेदी-विक्री सुरू करा. समृद्धी महामार्गाबाबच फक्त ठेकेदाराला दोषी धरुन चालणार नाही. या प्रकरणी संबंधित मंत्र्याला ताबडतोब मंत्रिमंडळातून काढायला पाहिजे.'

तसंच, 'आता ठेकेदारांनी त्यांना मोट कमिशन दाखवलं असेल ही कमिशन पाहिजे आहे. ५०० कोटी माळेगाव साखर कारखान्याला देणार आहे. कुठून आणणार आहात त्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री २० दिवस गावात बसतात. काय चाललं आहे या राज्यात. फार कठीण अवस्था आहे. महाराष्ट्राची लूट चालली आहे.', असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Padsare Waterfall : धबधब्यावर भिजायला आवडतं? मग 'पडसरे धबधबा' तुमच्यासाठी ठरेल बेस्ट ऑप्शन

Maharashtra Politics : भाजपला नवी मुंबईत खिंडार, ठाकरे गटाने दिला मोठा धक्का; VIDEO

नगरसेवकाचा लोगो, BMW गाडी आणि आत 32 कोटींचं MD ड्रग | VIDEO

Maharashtra Live News Update: ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Ajit Pawar: चिकन-मटण शॉपवर बंदी घालणं अयोग्य; उपमुख्यमंत्री अजित पवारांचं वक्तव्य; मग आदेश कोणी काढला?

SCROLL FOR NEXT