Sanjay Raut slow poisoning suspicion latest news saam tv
महाराष्ट्र

तुरुंग, आजार आणि विषप्रयोगाचा संशय! संजय राऊतांच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद

Sanjay Raut Slow Poisoning’ Suspicion : संजय राऊत यांनी त्यांच्या तुरुंगातील वास्तव्यानंतर आजाराची सुरुवात झाली असावी. तुरुंगात असताना ‘स्लो पॉयझनिंग’ झाले असण्याची शक्यता असल्याचा दावा राऊतांनी केलाय.

Bharat Jadhav

  • तुरुंगातील जेवणातून विषप्रयोग झाल्याचा दावा सध्या राऊत यांनी व्यक्त केलेला संशय आहे

  • आजाराची सुरुवात झाल्याचा दावा करत ‘स्लो पॉयझनिंग’चा संशय व्यक्त केला

  • राऊतांच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात नव्या आरोप-प्रत्यारोपांना सुरुवात

तुरुंगात असताना आपल्यावर विषप्रयोग झाला असावा, असा खळबळजनक दावा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलाय. एका दिवसापूर्वी त्यांनी माध्यमांशी बोलताना ईडीच्या तुरुंगातून बाहेर आल्यानंतर आपल्याला कॅन्सर झाल्याचा दावा राऊतांनी केला होता. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विष प्रयोगाबद्दल संशय व्यक्त करत 'टॉक्सिक टेस्ट' करून घेण्याचा सल्ला दिल्याचे संजय राऊत म्हणालेत. त्यानंतर शिंदे गटातील आमदार मंत्री गुलाबराव पाटील यांनी त्यावरून प्रतिक्रिया दिलीय.

संजय राऊत काय म्हणाले?

दिल्लीत काही दिवसापूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांची भेट घेतली होती. या भेटीदरम्यान राहुल गांधींनी खालावलेल्या प्रकृतीविषयी चौकशी केली. राऊत म्हणाले, माझ्या आजाराची सुरुवात तुरुंगात असतानाच झाली हे माझ्या लक्षात आले होते. राहुल गांधींनी मला सांगितले की, आपण तुरुंगात असताना हे सरकार इतके क्रूर आहे की ते आपल्या लोकांच्या बाबतीत काहीही करू शकते. तुमच्यासारख्या माणसाला अचानक असा आजार का व्हावा?"

जे समाजासाठी झटतात, त्यांच्या जेवणात तुरुंगात विष मिसळले जाऊ शकते. जे लोक समाजासाठी झटत असतात, आंदोलने करतात, असे लोक तुरुंगात गेल्यावर त्यांच्या जेवणात विष मिसळले जाण्याची शक्यता असते. फक्त मी नाही. अनेक लोक तुरुंगात गेल्यावर त्यांच्या जेवणात हे लोक विष मिसळू शकतात, असा अनेकांना संशय आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही ही शंका व्यक्त करून मला सावध केलंय, असे राऊत म्हणालेत.

टॉक्सिक टेस्टचा सल्ला

राहुल गांधी यांनी यासंदर्भात बोलताना शरीरातील विषारी घटकांची तपासणी करण्यासाठी 'टॉक्सिक टेस्ट' करून घेण्याचा सल्ला दिल्याचा राऊत म्हणालेत. "तुमच्या शरीरामध्ये विष वाढीचा प्रकार दिसत आहे, त्यामुळे तुम्ही ताबडतोब टॉक्सिक टेस्ट करून घेणे गरजेचे आहे. तुरुंगात गेलेल्या इतरही काही नेत्यांची प्रकृती अशाच प्रकारे खालावली असून ते आजारी पडले आहेत. त्यामुळे यामागे विषप्रयोगाची शक्यता नाकारता येत नाही." असे राहुल गांधी म्हणाल्याचे राऊत यांनी सांगितले.

शिवसेना शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया

संजय राऊत यांच्या दाव्यावर आमदार गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिलीय. मला माहित नाही संजय राऊतांवर कधी विषप्रयोग झाला, मात्र संजय राऊत बाहेर आल्यावर वेगवेगळे प्रयोग सांगत असतात. प्रयोग किती झाले हे मला तपासावं लागेल. राहुल गांधी हे कधी डॉक्टर झाले हे मला माहिती नाही. असा टोला गुलाबराव पाटील यांनी लगावला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

प्रसिद्ध दिग्दर्शकाचा हॉटेल रुममध्ये आढळला मृतदेह; २८ वर्षीय डायरेक्टरच्या निधनाने सिनेसृष्टीत शोककळा

Sunday Horoscope: पैशाची तंगी जाणवेल, 3 राशींचे भाग्य उजळेल; वाचा रविवारचं राशीभविष्य

Durga Puja Pandal: दुर्गा पूजेचा मंडप कोसळला; चेंगराचेंगरीत १७ जणांचा मृत्यू

दिल्लीतील आंदोलनाची धग थेट लंडनपर्यंत, ध्रुव राठीने सांभाळली लंडनमध्ये आंदोलनाची धुरा

गुरांच्या चाऱ्याला तिजोरीचं कुलूप, दुष्काळासोबत चोरीचंही संकट

SCROLL FOR NEXT