SANJAY RAUT ALLEGES PLOT TO KILL TWO MLAS saam tv
महाराष्ट्र

2 आमदारांना मारण्याचा कट; खासदाराच्या दाव्याने महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ

Maharashtra Politics: शिवसेनेच्या बंडादरम्यान सुरतेते घडलेल्या घडामोडींबाबत नवा ट्विस्ट आलाय...एक नव्हे तर थेट दोन आमदारांना मारण्याचा कट होता असा धक्कादायक आरोप करण्यात आलाय. कुणी केलाय हा आरोप? कोण आहेत ते दोन आमदार? नेमका कुणावर आहे रोख? पाहूयात हा रिपोर्ट.......

Omkar Sonawane

एकनाथ शिंदेंच्या बंडावेळी एका आमदाराचं 'रामनाम सत्य' झालं असतं, असं खळबळजनक विधान मंत्री संजय शिरसाटांनी केल्यानंतर आता यावरून राजकारण चांगलचं तापलयं...ठाकरेसेनेचे खासादर संजय राऊतांनी शिरसाटांच्या विधानाचा धागा पकडून 2 आमदारांना मारण्याचा कट रचला गेल्याचा गंभीर आरोप केला... राऊत नेमकं काय म्हणाले ऐका....

मुळात आमदार कैलास पाटील आणि आमदार नितीन देशमुखांनी आपला जीव बंडादरम्यान धोक्यात होता, असं स्वत: सांगितलयं...तर नितीन देशमुखांनी तर थेट घातपाताचा डाव असल्याचा आरोप केलाय. त्यामुळे शिरसाटांच्या विधानानंतर हत्येच्या कटाची चौकशी करावी, अशी मागणीही कैलास पाटलांनी केलीय... तर आबिटकरांनी यासंदर्भात काय प्रतिक्रिया दिलीय? ऐका...

तर राऊतांनी दोन आमदारांच्या हत्येचा कट केल्याचा आरोप शिंदेसेनेनं फेटाळून लावलाय... तर राऊतांना मुर्खासारखे बोलण्याची सवय लागलीय, असा पलटवार भाजपनं केलाय...शिवसेनेच्या बंडाला आता चार वर्ष उलटून गेली. पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं. मात्र संजय शिरसाटांनी रामनाम सत्यचं विधान करून या बंडा दरम्यान सुरू असलेल्या कट-कारस्थानांवरून पुन्हा एकदा राजकारण पेटलंय. मात्र हे आरोप खरे असतील तर त्याची चौकशी करून सत्य काय ते बाहेर आणायला हवं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Police Transfers: 6 SP, 5 नवे DYSP येणार! अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या, नववर्षात सोलापूर पोलीस दलात मोठा फेरबदल

Maharashtra News Live Update: रेल्वेतून उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे वाचला जीव

Wednesday Horoscope: 'या' राशींच्या नशिबात आज आनंदाची बातमी! कोणाला आर्थिक लाभ, तर कोणाच्या आयुष्यात येणार नवी संधी?

4 हजार कुटुंबांना म्हाडाची घर खाली करण्याची नोटीस; नेमकं कारण काय?

Kanjivaram Silk Saree Designs: पारंपरिक लुकला द्या रॉयल टच! कांजीवरम सिल्क साडीचे ७ सुंदर ट्रेंडिंग डिझाईन्स

SCROLL FOR NEXT